राज्यमंत्री- मा. संजयभाऊ_बनसोडे_साहेब यांनी काल दिल्ली येथील सरकारी शाळेची पाहणी केली

 राज्यमंत्री- मा. संजयभाऊ बनसोडे साहेब यांनी काल दिल्ली येथील सरकारी शाळेची पाहणी केली

नादेड जिल्हा प्रतिनिधी (पप्पू निवळीकर लष्कर वार्ता)      

लातुर जिल्ह्य़ातील उदगीर जळकोट तालुक्याचे मानीय आमदार दिल्ली दौऱ्यावर असताना                            राज्यमंत्री- मा. संजयभाऊ बनसोडे साहेब यांनी काल दिल्ली येथील सरकारी शाळेची पाहणी केली यावेळी देशांमध्ये एक वेगळा पॅटर्न निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची जाणीव झाली

 ती उत्कृष्ट शाळा,शिक्षणाचा दर्जा व विविध कलागुणांना वाव देणारे उपक्रम दिल्ली सरकारच्या वतीने राबवले जात आहेत, त्याच धर्तीवर माझ्या मतदारसंघांमध्ये काही मॉडेल शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे त्यासोबतच गोर गरिबांसाठी मोफत "मोहल्ला क्लीनिक" ही संकल्पना कशा पद्धतीने राबवली जाते याची पाहणी केली

 त्या दृष्टीने मतदारसंघात विशेष प्रधण्याने काय करता येईल याची चर्चा केली यावेळी दिल्ली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री श्री.मनीष सिसोदिया यांनी माझे स्वागत केले व दिल्लीतील दोन्ही शाळांना सोबत राहून संपूर्ण माहिती दिली.

 गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विशेषतः दिल्ली सरकार व  श्री.मनीष सिसोदिया साहेब यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत याच दुर्षतिने उदगीर विधानसभा मदारसंघातील शाळेचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली पॅटर्न करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या