खास दीपावलीच्या निमित्ताने..ग्रामिण शहरी भागातील खाद्य पदार्थ व वस्तुंचे भव्य दिव्य प्रदर्शन.

 खास दीपावलीच्या निमित्ताने..ग्रामिण शहरी भागातील खाद्य पदार्थ व वस्तुंचे भव्य दिव्य प्रदर्शन.

उस्मानाबाद प्रतिनिधी (प्रविण राठोड) :- स्वराज्य शिक्षण प्रयोग उस्मानाबाद व सखी युनिक रुरल एंटरप्राइज यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या शहरांमध्ये ग्रामीण महिला व्यवसायिकांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार वस्तूंचे व खाद्यपदार्थांची तालुकास्तरीय विक्री प्रदर्शनास आजपासून  सुरुवात झाली आहे,हे प्रदर्शन दि.29 व 30 आॅक्टोंबर 2021 म्हणजेच आज व उद्या सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी यशराज मंगल कार्यालय नगर परिषद नाट्य सभागृहा समोर उस्मानाबाद येथे भरले आहे..गरज राहिल वास्तवतेची या स्वयंसेवी वस्तुंच्या भव्य प्रदर्शनास आपणही भेट देऊन आवडणा-या खाद्य पदार्थांची व वस्तुंची खरेदी करावी असे आवाहन करुन शुभेच्छाही सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी दिल्या..श्री राऊत यांनी प्रदर्शनात भरलेल्या महिला बचतगट,स्वयंसेवी संस्था, उपलब्ध धान्य,खाद्य पदार्थ व इतर वस्तुंची माहिती दिली.तर सुजाता ताई पाटिल यांनी आभार मानले.आज रोजी या व्यावसायिकांच्या उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थाचे विक्री प्रदर्शनास उपस्थित राहिलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते सतीश लोंढे तसेच प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या सौ.सुजाता ताई पाटील,संजय राऊत, प्रदर्शनात सामिल झालेले महिला बचतगट,स्वयंसेवी संस्था आणि अन्य इतर सहभागी झालेल्या बंधु भगिनी..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या