पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती

 पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड

सोलापूर - पत्रकारिता एक विचार ध्यास चळवळ समजून पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जाणारे दिवा (जिल्हा ठाणे ) येथील क्राईम सूत्र चे सह संपादक विकास जगताप यांची पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे

पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असणारे आक्रमक पत्रकार म्हूणन विकास जगताप यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून परखड लेखन व सडेतोड बातमी मुळे विकास जगताप यांच्यावर हल्ले देखील झाले असून त्यांच्या लेखणीने कधीच खच खाल्ली नसून उलट नव्या दमाने त्यांचे विचार क्राईम सूत्र वृत्तपत्र च्या माध्यमातून मांडत आहेत भटक्या विमुक्त संघर्ष समिती च्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट मंत्रालयात जाऊन सोडवण्याच्या त्यांनी नेहमीच प्रयत्न करत असल्याने उत्कृष्ट समाजसेवक म्हूणन त्यांनी नावंलौकिक मिळवला आहे त्यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये नवंचैतन्य निर्माण झाले असून तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न मंत्रालयात मांडणारा पत्रकार म्हूणन त्यांची ख्याती असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची धमक असणार उमदा युवा पत्रकार विकास जगताप यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून या निवडीने प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे राज्य सचिव डॉ आशिष कुमार सुना राज्य उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे  मराठवाडा कार्याध्यक्ष यशवंत कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बायस मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे सरचिटणीस मनोज जैन सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन ताकमोघे   संघटक दिनेश सलगरे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ  जालना जिल्हा अध्यक्ष गोपाळ त्रीवेदी  गडचिरोली जिल्हा अध्यक्ष देवेश पेंदापल्लीवार रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन   जाधव नितीन चव्हाण मोहन 

शिंदे   यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या