महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचा वाढदिवसा निम्मित अपघातात मृत झालेल्या कुटुंबास मंगेश कदम यांच्या कडून शिलाई मशीन भेट.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी पपु निवळीकर
नांदेड:-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश कदम यांच्या कडून काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते प्रकाश किशनराव वानखेडे राहणार श्रीकृष्ण नगर तरोडा बु प्रभाग क्र. 02 नांदेड यांचा काही वर्षां पूर्वी मोटरसायकलचा गंभीर अपघात झाला होता त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर बऱ्याच वर्षां नंतर त्यांचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता प्रकाश वानखेडे यांच्या पत्नी संगीता वानखेडे यांना मंगेश कदम, ॲड.धम्मपाल कदम यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित साधून शिलाई मशीन भेट देण्यात आली. यावेळी मंगेश कदम,ॲड. धम्मा कदम, प्रवीण वाघमारे, अमोल जोंधळे, राजू भिसे , छाया वानखेडे, पंचफुला बाराटे,रुद्रा वानखेडे,साई वानखेडे आदी उपस्थिती होते.

0 टिप्पण्या