ना श्री नितिनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब भेट
नांदेड जिल्हा प्रतिनिधी पपु निवळीकर लष्कर वार्ता
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा ना श्री नितिनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब भेट घेऊन लातूर जिल्ह्य़ातील उदगीर जळकोट मतदारसंघातील व त्याच बरोबर मतदारसंघाच्या शेजारील तालुक्यातील विविध रस्ते चौपदरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली
या मध्ये प्रामुख्याने आष्टा मोड ते देगलूर रस्ता वडगाव पाठी ते तेलंगणा बॉर्डर पर्यंत मंजूर करून त्याच बरोबर दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा उदगीर ते शिरूर रस्ता मिसिंग लेन अंतर्गत निधी मंजूर करणे उदगीर शहराचा सर्वात महत्वाचा असलेला रींग रोडचा प्रश्न मार्गी लावणे आष्टा मोड ते टीवटग्याळ पाटी या सह विविध मागण्याचे निवेदन दिले त्याच बरोबर सी आर एफ अंतर्गत विविध रस्ते सुधारण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली
यावेळी मा मंत्री महोदय श्री नितीनजी गडकरी साहेब यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व प्रस्थावीत मागण्या मंजूर केण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या व सदरील सर्व कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्यासाठी सूचना केल्या येणाऱ्या काळात उदगीर व परिसरात जोडणारे रस्ते अतिशय दर्जात्मक व शहराच्या शोभेत भर टाकणारे होतील या बाबत मी आशावादी आहे

0 टिप्पण्या