अन्नासाहेब पाटील अर्थिकविकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांनी उध्दोजक बनावे .. बचाटे

 


 अन्नासाहेब पाटील अर्थिकविकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांनी उध्दोजक बनावे .. बचाटे

 पालम तालुका प्रतिनिधी  ; अवधुत जाधव

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अथक परिश्रमातून मिळालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा तरुणांनी उध्दोजक बनावे अशी भावना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बचाटे यांनी पालम येथील बैठकित मराठा युवकांना मार्गदर्शन केले सदरील बैठकीस महीला जिल्हाध्यक्षा उज्वला पाटील जिल्हाउपाध्यक्ष राजेश सोळंके  उपस्थित होते.


 या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालम तालुकाध्यक्ष पदी प्रकाश  सिरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले

अखिल भारतीय मराठा महासंघाची बैठक पालम येथे सिरस्कर कौम्प्लेक्स येथे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बचाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते मराठा तरुणांनी राजकीय पक्षांच्या पोळ्या भाजण्या पेक्षा आपल्या समाज बांधवांच्या गोवऱ्या थापल्या तरी चालतील पण आज सुशिक्षित तरुणांना उद्योजक व व्यावसायिक प्रवाहात आणणे काळाची गरज असल्याचे विचार बोलून दाखवले या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालम तालुकाध्यक्ष पदी प्रकाश   गणेशराव सिरस्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्वला पाटील मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश सोळंके भानुदास सुर्यवंशी परभणी जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भोसले  जिल्हाकार्यध्यक्ष मधुकर चोपडे जिल्हासरचिटणीस अशोक सोळंके हरिभाऊ जाधव अशोक सातपुते बालासाहेब जाधव गंगाखेड तालुकाध्यक्ष शिवाजी राव चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांचे पालम तालुक्यातील युवकांनी पुष्पहार देऊन स्वागत केले सदरील बैठकीत पालम तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेले प्रकाश गणेशराव सिरस्कर यांचा व तालुका उपाध्यक्ष यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी पालम येथील राजूभाऊ सिरस्कर रमेश शिंदे पेट पिंपळगावकर, बबन हनवते, संभाजी भागवत ,नारायण एडके,बालासाहेब जाधव,पंडित भोसले, यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य  समाज बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या