नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथे गरीब शेतकऱ्याचा पावणे दोन एकर ऊस जाळून खाक - शेतकऱ्याचे मोठे नुकसान --मदतीची गरज ---शेतकरी बाबुराव तोडे

 नायगाव तालुक्यातील आंतरगाव येथे गरीब शेतकऱ्याचा पावणे दोन एकर ऊस जाळून खाक - शेतकऱ्याचे मोठे नुकसान --मदतीची गरज ---शेतकरी बाबुराव तोडे 

नायगाव / रुई प्रतिनिधी माधव पवार 

दि -२७ नायगाव तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील रहिवासी असलेल्या एका गरीब कुटूंबातील शेतकऱ्याचा पावणे दोन एकर ऊस विद्युत वितरण कंपनीचा तार तुटून स्पर्किंग झाल्यामुळे शेतकरी बाबुराव लक्ष्मण तोडे या शेतकऱ्याचा ऊस जाळून खाक झाल्याची घटना दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान आंतरगाव येथे सदरची घटना घडली असून अगोदरच नायगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना हे नवीनच संकट शेतकऱ्या समोर हुभे राहिले आहे


तालुक्यातील मौजे आंतरगाव येथील शेतकरी बाबुराव लक्ष्मण तोडे यांनी ऊसाची पावणे दोन एकर मध्ये केली होती परंतु अचानक विद्युत वितरणचा तार शेतात पडल्यामुळे लागलेल्या अगीत शेतकऱ्याच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांना न्याय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी  राजकीय पुढाऱ्यासह नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी प्रयत्न करावेत असे आंतरगाव येथील गरीब शेतकरी बाबुराव लक्ष्मण तोडे सदरील जळालेल्या ऊसाचा तत्काळ पंचनामा करून  मदत द्यावी असे शेतकऱ्याचे म्हणे आहे


आंतरगाव येथील शेतकरी बाबुराव तोडे हे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेणार असून शेतकऱ्यांना शेतात आता कांहीच उरले नाही गेल्या काही महिन्याखाली नायागांव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले यातच शेतकऱ्याचे चांगलेच दीपावली पूर्वी दिवाळे निघाले आहेत अध्याप शासनाची कोणती ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसून फक्त घोषणा बाजी व आदेश निघाले प्रतिक्षात शेतकऱ्याच्या खात्यात पैसे पडले नाहीत शासनाच्या नियमानुसार आणखी काही दिवस तरी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे


पंतप्रधान पीकविमा कंपनी कडून अध्याप कोणती ही घोषणा करण्यात आली पीक विमा शेतकऱ्यांना किती मिळणार व कधी मिळणार यांची नक्की खात्री वाटत नसली तरी शेतकरी मात्र विमा मिळेलच या आशेने अपेक्षा करीत असून गेल्या वर्षाचा ही पीकविमा शेतकऱ्यांना मिळाला नाही अशा अनेक संकटात शेतकरी सापडला असल्यामुळे प्रशासनाने व राजकीय पुढाऱ्यानी विमा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आंतरगाव येथील एका शेतकऱ्यानी आपली भावना व्यक्त केली असली तरी खरे तर नायगाव तालुक्यातील आंतरगावच्या गरीब शेतकऱ्याचा पावणे दोन एकर ऊस विद्युत वितरण कंपनीचा तार तुटून ऊस जाळून खाक झाला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या