पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालय येथे आज रोजी शिवशंभो ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले
पालम प्रतिनिधी अवधूत जाधव
शिवशंभो ऐतिहासिक परीक्षेचे आयोजन हे वडू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समिती मार्फत करण्यात आले होते .
पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार घालून परिक्षची सुरुवात करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज, व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सर्व विषयाबद्दल या परीक्षेचा विषय निवडला होता
परीक्षेला पालम तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील 50 ते 60 विद्यार्थी बसलेल होते परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रायगड किल्ला येथे 51 हजार रुपये, द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास प्रत्येकी 21 हजार रुपये व
तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 11अकरा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सांगितले
पेठ पिंपळगाव येथील युवक सचिन पवार यांनी एक महिन्यापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्येकांच्या गावी जाऊन मार्गदर्शन केले सचिन पवार यांनी स्वतः परिश्रम घेतले.
यावेळी या परीक्षा समितीचे जिल्हा प्रमुख अजय बदाले. गजानन राव हुलगिर . राहुल हनवते. राजेंद्र मुळे सर ,यांच्यासह सर्व परीक्षार्थी व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 टिप्पण्या