बँक खाते गोठवल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत
एसबीआय बँक अधिकाऱ्याचा गंगाखेडात प्रताप
गंगाखेड प्रतिनिधी
दिवाळीच्या तोंडावर बँकेचे खाते गोठेवल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या आदेशाला तिलांजली देण्याचा प्रताप गंगाखेड एसबीआय बँक अधिकाऱ्यांनी करून दाखवला.
गंगाखेड येथील शनिवार बाजार समोरील एसबीआयच्या मुख्य शाखेत शेतकऱ्यांचे खाते गोठविण्यात येत आहेत .कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची खाते गोठवून वसुली केली जावी हा कारण पुढे करून बँका अधिकारी शेतकऱ्यांची खाते गोठवत आहेत. या शेतकऱ्याकडे जुनी थकबाकी असेल किंवा चालू बाकी असेल तरी त्या शेतकऱ्याचे त्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे पैसे पडत असतील तर ते खाते गोठवले जाऊ नये असा शेतकरी सन्मान योजनेचा नियम आहे. तरी या नियमांना पायदळी तुडवत बँक अधिकाऱ्याकडून सरसगट खाते गोठविण्यात येत आहेत. यासंदर्भात वाघलगाव येथील शेतकरी दत्तराव अळणुरे यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कडे खाते गोठवल्या ची तक्रार मांडली. यानंतर बँका अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता मी कोणत्याही परिस्थितीत गोठवलेले खाते काढणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून गोठवलेले खाते काढण्याचे निवेदन दिले . तहसीलदार यांनी बँक अधिकाऱ्याच्या विरोधात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले.यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर ,शिवाजी महाराज बोबडे, शेतकरी दत्तराव अळणूरे उपस्थित होते.

0 टिप्पण्या