शेतकऱ्याच्या मुळावर देगलूरची निवडणूक बेतली नुकसान भरपाईचे अनुदान दीपावली पूर्वी मिळेल म्हणून शेतकऱ्यांना अपेक्षा वाटली
नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार
नांदेड जिह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात तब्बल एका महिन्यापासून राज्यातील विविध पक्षातील राजकीय पुढारी, खासदार, आमदार, कार्यकर्ते या विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकच्या संदर्भात मग्न झाले असले तरी जिल्ह्यासह नायगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्या खाली अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे
महाराष्ट्र शासनाची तुटपुंजी अनुदानाची मदत शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी मिळेल असी अपेक्षा वाटतं होती परंतु शेतकऱ्याच्या मुळावर देगलूरची निवडणूक बेतली असल्यामुळे शासनाने शासकीय अनुदान देण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावे लागणार असे सांगितले असले तरी ती परवानगी कशासाठी घ्यावी लागते असा सवाल कोळी महासंघ नायगाव तालुका अध्यक्ष सचिन दत्ता पिटलेवाड बरबडेकर यांनी प्रशासनाला केला आहे
ग्रामीण भागासह तालुक्यातील जनतेसह जिल्ह्याच्या नागरिकांचे देगलूर बिलोलीच्या निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.परंतु शेतकऱ्याचे अनुदान दीपावली पूर्वी दिल्या जावे व निवडणूक विभागाच्या परवानगीची आडकाठी नं टाकता महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने व प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या पिकाचे अनुदानची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करावी. व त्याच बरोबर पीक विमा कंपनीने सुद्धा दीपावली पूर्वीच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणीही पिटलेवाड यांच्यासह तमाम शेतकऱ्यांनी केली असली तरी शेतकऱ्याच्या मुळावर देगलूर-बिलोलीची निवडणूक चांगलीच बेतली आहे.

0 टिप्पण्या