कृष्णूर युवनिट अंतर्गत असलेल्या चोवीस गावातील शेतकऱ्याऱ्यासह मीटर धाराकांनी बिल भरून सहकार्य करावे सहायक अभियंता एम जे पठाण यांचे आवाहन
नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर युवनिट अंतर्गत असलेल्या चोवीस गावातील विद्युत मीटर धारकानी विद्युत वितरण कंपनीला झटपट बिले भरून सहकार्य करावे असे आवाहन विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता एम जे पठाण यांनी केले असून भविष्यात विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व शेतकरी व मीटर धारक बांधवानी पैसे भरून घ्यावेत बिल भरलेल्या पावत्या घेऊन जावेत असे ही पठाण यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कृष्णूर युवनिट अंतर्गत एकूण चोवीस गावे आहेत या गावा अंतर्गत असलेले नागरिक ही पूर्वी पासून विद्युत वितरण कंपनीला आकारलेलं बिले भरून सहकार्य केले असल्यामुळे आता ही त्याच पद्धतीने विद्युत मीटर धारकांनी बिले भरून घेतील असी अपेक्षा व्यक्त केली असली तरी वाटेल तेवढी वसुली सदरच्या गावा अंतर्गत मीटर धारक ग्रहकाकडून होत नसल्यामुळे पठाण यांनी नाराजी ही व्यक्त केली आहे
राज्यासह कृष्णूर युवनिट विद्युत वितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यामुळे विद्युत मीटर ग्राहकानी तत्काळ बिले भरावेत अन्यथा आठ ते दहा दिवसात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल असे ही एम जे पठाण यांनी सांगितले असून यावेळी गावातील मीटर धारकाकडे वसुलीसाठी सहाय्यक अभियंता एम जे पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता पि एस जाधव,आर के पांचाळ, बि एम जोगदंड, ओ एन चन्नेबोईनवाड, यांच्यासह शेख रमाजन, सहकार्य बाबुराव वाघमारे आदीने वसुली फिरत आहेत
सोमठाणा, रुई बु, सावरखेड, निळेगव्हण, रुई खुर्द, रानसुगाव, हिप्परगा, वंजारवाडी, नरगंल, मांडणी, मनुर, इज्जतगाव, आंतरगाव, कहाळा बु,कहाळा खुर्द, घुंगराळा, पाटोदा, बरबडा, बळेगाव, कृष्णूर, टाकळी, वजीरगाव,येथील मीटर धारकाकडून सहाय्यक अभियंता एम जे पठाण यांची टीम चांगल्या प्रकारे काम करीत असून वसूली सुद्धा ग्राहकाना त्रास न जाणवू देता वसुली केली जात असून मीटर धाराकांनी काळजी घेऊन बिल भरावे असे आवाहन पठाण यांनी केले आहे

0 टिप्पण्या