परंडा येथील जेष्ठ नागरिक मानसिंह गुलाबसिंह ठाकूर वय ८५ यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमारास निधन झाले.

 परंडा येथील जेष्ठ नागरिक मानसिंह गुलाबसिंह ठाकूर वय ८५ यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी पहाटे पाच वाजणेच्या सुमारास निधन झाले.


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी प्रविण राठोड      


भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार  सुजितसिंह ठाकूर, व भाजपाचे परंडा नगर परिषद मधील गटनेते सुबोधसिंह ठाकूर, यांचे ते वडील व उद्योजक भीमसिंह ठाकुर व अजयसिंह ठाकूर, यांचे बंधु होते


 ठाकूर घराण्यातील सर्वात वयस्क , शांत , संयमी असे व्यक्तीमहत्व असलेले, मानसिंह ठाकूर सर्वांना सोडून गेल्याने ठाकुर कुटुंब शोकाकुल झाले.


माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी आमदार सुजितसिंह ठाकूर सह त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले .


 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, तीन मुले , मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.


शहरातून भव्य अंतयात्रा काढून, 

 शहरातील बावची रस्त्यावरील स्मशानभूमीत दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार केले, सर्व नातलग, तालुका व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी , चाहते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 सर्व पक्षीय पदाधिकारी उद्योजक, प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने अंतदर्शनासाठी आले होते. शहरात सर्वत्र शोककळा पसरली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या