नांदेड मुखेड येथे भाजपा ला तालुक्यात जोरदार धक्के चालूच, दोन निष्ठावंत माजी तालुकाध्यक्षांसह अनेकांचा पक्षत्याग मुखेड

 नांदेड मुखेड येथे   भाजपा ला तालुक्यात जोरदार धक्के चालूच, दोन निष्ठावंत माजी तालुकाध्यक्षांसह अनेकांचा पक्षत्याग मुखेड 


नांदेड जिल्हा  प्रतिनिधी पपु निवळीकर


    भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर  यांच्यापाठोपाठ माजी आ. अविनाश घाटे यांच्या पक्षत्यागाचे पडसाद तालुक्यात उमटू लागले असून भाजप चे दोन निष्ठावंत माजी तालुकाध्यक्षांसह अनेकजण आज पक्षत्याग करून काँग्रेस प्रवेश करीत आहेत.

      माजी खा. खतगावकर यांच्या पाठोपाठ त्यांचा शब्द व मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या कृष्णशिष्टाईने  मुखेड तालुक्यातील माजी आ. अविनाश घाटे,ज्येष्ठ नेते माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम पाटील राजुरकर यांनी भाजपचा त्याग करून काँग्रेस प्रवेश संकेत देताच तालुक्यातील निष्ठावान भाजपा कार्यकर्त्यांत ही अस्वस्थता निर्माण होऊन असंतोषाला मार्ग मिळाला आहे. मा. आ. बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाने भाजप चे २ निष्ठावान कार्यकर्ते तथा माजी तालुकाध्यक्ष सूर्यकांत अल्लडवाड व नामदेव पाटील जाहुरकर, माजी शहराध्यक्ष तथा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीम पाशा, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडव मुंगणाळे आदींनी आपल्या समर्थकांसह भाजपा सोडून शनिवारी शंकर नगर येथील जाहीर सभेत काँग्रेस प्रवेशाचा लेखी मनोदय कळविला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर प्रवेश महत्वाचे मानले जात आहेत. आजच तालुक्यातील एका भाजपा जिल्हा परिषद सदस्या चे घरातली व्यक्ती सेना प्रवेश करून एक धक्का दिल्याची चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या