नायगाव तहसील प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई अनुदानाच्या याद्या तलाठी व मंडळधिकाऱ्याकडे प्रलंबित शेतकऱ्यातुन संताप ---
नायगाव रुई प्रतिनिधी माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यासह नायगाव तहसील प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्यांना दीपावली पूर्वी मिळाल्या जाणारे नुकसान भरपाईच्या याद्या तलाठी व मंडळधिकाऱ्या कडून अद्याप मागविल्या नसल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला जात असून आघाडी सरकारने तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची तूटपुंजी रक्कम टाकली जाईल असे सांगितले असले तरी नायगावच्या तहसील प्रशासनाने मात्र कसल्याच प्रकारे तलाठी व मंडळधिकारी मार्फत तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असल्याचे सरळ सरळ दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील तमाम शेतकऱ्याचे यंदा अतिवृष्टीमुळे शेतातील पिकाचे अतोनात प्रचंड नुकसान झाले असताना सुद्धा राज्यातील राज्यकर्त्यासह प्रशासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही कोरोनाच्या नावाखाली शेतकऱ्यांना व जनतेला वेठीस धरून शेतकऱ्यांना व जनतेला देशोधडीला पाठवले त्यात महागाईचा भडका उडाला आणि शेतकऱ्यांना त्या महागाईच्या चटक्याने शेतकरी भाजून निघाला असताना ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या भोंगळ कारभारामुळे नायगावचे तहसील प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे सदरच्या अनुदानाच्या याद्या तलाठ्या कडून मागविल्या नसल्याचे सरळ सरळ ऐकावयास मिळत असून महाराष्ट्र शासन या बाबीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यासह जनतेतुन बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्यात एकूण गावे ८८ ते ८९ असल्यामुळे शेतकऱ्यानी पीकविमा मोठया प्रमाणात विमा कंपनीला भरला असला तरी पंतप्रधान पीकविम्याचा गेल्या वर्षा पासून नुसता फुसका बार उडाला असून गेल्या वर्षाचा ही पीकविमा शेतकऱ्यांना अध्यापा मिळाला नसल्यामुळे पीकविमा कंपनीच्या कार्यप्रणालीवर शेतकरी संताप व्यक्त करीत असून यंदा ही पीकविमा कंपनीला शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात विमा भरला असलातरी पीकविमा मिळणार की नाही यांची यांची ही शेतकऱ्यांना नक्की खात्री वाटत नाही असे ही शेतकऱ्यातुन बोलल्या जात असले तरी जिल्हाधिकाऱ्यासह नायगाव तहसील प्रशासनाच्या बेजबाबदार पणामुळे शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई अनुदानाच्या याद्या तलाठी व मंडळधिकाऱ्या कडून मागविल्या नसल्यामुळे शेतकऱ्यातुन संताप व्यक्त केला जात आहे

0 टिप्पण्या