कामजळगा उपकेंद्रात 293 जणांचे लसीकरण.

 कामजळगा उपकेंद्रात 293 जणांचे लसीकरण.


नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार


नांदेडचे जिल्हाधिकारी मा.विपीन ईटनकर यांच्या मिशन ७५ तास लसिकरण या अभियाना अंतर्गत मुखेड तालुका प्रशासनाच्या वतिने गाव तिथे लसिकरण मोहीमेच्या शेवटच्या दिवशी प्रा.आ.के.सावरगाव अंतर्गत उपकेंद्र कामजळगा येथे प्रा.आ.केंद्रातील आजपर्यंतच्या लसीकरणात सर्वाधिक 293 लाभार्थी यांना लस टोचण्यात आली.या 75 तासात प्रा.आ.केंद्राचे 3355 लसीकरण झाले. हा आकडा अशा मोठ्या लसीकरणाचेच फलीत आहे.

असे बोलत तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले, डॉ बालाजी गरुडकर, डॉ.सोनाली शिंदे यांनी उपकेंद्राचे सिस्टर जाधव जी.आर.,पाटील एल.एच. व्ही. व त्यांच्या सर्व टिमचे कौतुक केले. लसीकरन या ठिकाणी एल.एच.व्ही.पाटील, ए.एन.एम. जाधव जी.आर.,आशा वर्कर, मदतनीस, सरपंच,शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या