वरुन राजान टाकली पावसाची सरीवरसर, गंगाखेड शेहरात रस्तोरस्ती आलाय महापुर,
गंगाखेड प्रतिनिधी पवन राजेश सोळंके.
श्रावण महिन्याचा शेवट आणि या महाराष्ट्रातील सांस्कृतिक उत्सवाच्या मुहूर्तावर, सर्वत्र बैलपोळ्याच्या उत्सवात तयारीत शेतकरी मित्र असतानाच, पावसाच्या सरींनी सुरुवात केली
दिनांक 06/09/ 2021 पासून ते दिनांक 07/09 /2021 सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोधार पाऊस चालू असल्याने, नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले,गंगाखेड शहरात रस्त्या रस्त्यावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने,बऱ्याच गोरगरीबाच्या झोपडीत, चिखल मातीच्या घरात पाणी शिरले असल्याने, अगोदरच अर्थीक अडचणीत असताना,त्यात हे अतिवृष्टीने घरातील असणार जगण्याच सामान ही भिजून नासाडी झाली आहे,
यामुळे जनसामान्यांच्या चर्चेतून शासनाने या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गोरगरीबांना अर्थ सहाय्य करावे असे सुर निघत आहेत.पाहुया प्रशासन काय पाऊल उचलत ते ?

0 टिप्पण्या