पालम शिवारातील सुरेश किशनराव शिंगोळे यांची बैल जोडी पुरात वाहून गेली बैलाचा जागीच मृत्यू

 


प्रतिनिधी अशोक सोळंके : पालम येथील आई भागातील पूल पालम फळा सोमेश्वर जाणाऱ्या रस्त्यावर असणारा पूल कमी उंचीचा असल्याने शेतकऱ्यांना पूर आल्यानंतर अलीकडून पलीकडे किंवा पलीकडून अलीकडे येण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत असतात आज अचानक आलेल्या महापुरामुळे शेतकरी सुरेश किशनराव शिंगोळे हे पाऊस सुरू झाल्याने शेतातून गावाकडे जाताना    पालम येथील देवकाई भागातील पुलाची उंची कमी असल्याने,नदीला पुराचा लोंढा आला व  सुरेश इंगळे यांची बैलाची जोडी पुरात वाहून गेली व मृत्युमुखी पडले. पालम ते फळा व सोमेश्वर या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्याने अनेक वेळा असे अपघात होतात.आमदार, खासदार, येतात, आश्वासन देतात, आणि निघून जातात.पुलाच्या उंचीचा प्रश्न मात्र जाग्यावरच, सदर बैलजोडी पुरात वाहून मृत्यू झाल्याने सुरेश किशनराव शेंगुळे याचे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले असून, प्रशासन व शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी शेतऱ्याची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या