अंबुलगा,जाहुर महसुल मंडळात व परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती.

अंबुलगा,जाहुर महसुल मंडळात व परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती.



नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज बिरादार  दिनांक :- 4/9/2021 :

जाहुर:- आज मुखेड तालुक्यातील अंबुलगा महसुल मंडळ व जाहुर महसुल मंडळात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन विजेचा कडकडासह मेघगर्जनेसह,अति प्रमाणात पाऊस पडुन जनुकाही ढगफुटी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात उंद्री प.दे.,जाहुर,अंबुलगा,राजुरा,सांगवी,लिंगापुर,भाटापुर,बिल्लाळी,औराळ,लोनाळ,मेथी,धनंज,चोंडी,एकलारा,या गावात व परिसरातील शेतात काढनीला आलेले शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास उडीद,सोयाबीन कापुस,तुर,पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांचे उडीत कापुन गोळा करून ढिग ठेवले होते त्याचे पण मोठं नुकसान झालं आहे. बरेच शेतकऱ्यांना मजुर परवडत नसल्यामुळे कापनीस आलेले उडिद,सोयाबीन पावसामुळे भिजुन गेले तर काहींचे वाहुन गेले आहे.अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे व शेतकर्यांच्या हक्काचे पिक विमा मंजुर करुन अतिवृष्टी अनुदान मिळवुन द्यावे.

नांदेड जिल्हाचे मा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री मा नामदार अशोकराव चव्हाण साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विमा कंपनीला आगाऊ 25% रक्कम अदा करण्याचे सुचना दिली. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांचे खुपचं जास्त नुकसान झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करून त्यांना त्यांच्या हक्काचं  भरीव पिक विमा मिळवुन‌ शासनाचे अतिवृष्टी अनुदान मिळवुन द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या ढगफुटीत जाहुर,अंबुलगा,महसुल मंडळातील सर्व  परिसरातील अनेक गावातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या