पहिल्या प्रेमाचा पहिला पाऊस
येता तुझी आठवण
येती अंगवार शहारे
प्रेमनगरीत वाहतात
तुझ्या आठवणींचे वारे
होता तुझा होकार थेट म्हणून
अविस्मरणीय झाली पहिली भेट
प्रेमाच्या डोहात दोघांची मुसंडी
अन त्यात पडली ती गुलाबी थंडी
गोड राणीला मिळाला स्वप्नातला राजा
त्यात धोधाे बरसला वरुणराजा
हात पाय कापत होते
शरीर पडले होते थंड
हा तर आपला प्रेमासाठीचा बंड
मृदू तो तुझा पहिला स्पर्श मला वाटे हवा हवा
तुझ्या भेटीसाठी केवढा हा संघर्ष
तुझं नि माझं नातं आहे जणू स्वर्ग हा नवा
कठीण प्रसंगात साथ तुझी हवी आहे
देशील साथ मला आयुष्यभर हा माझा विशवास आहे
अडथळे, संकटं येतील भविष्यात
न डगमगता जगू अापण प्रेमविश्वात
जीवनात काही नाही मिळवायचं मला तूच आहेस माझा श्वास
प्रेमात कधीही माझ्याकडून तुला नाही होणार त्रास
प्रत्येक क्षण फक्त तुझ्याचसाठी हाच माझा ध्यास
तुझ्या मिठीत आयुष्यभर राहायचं आहे
पिल्लू तुझ्यावर मला खूप प्रेम करायचं आहे
पिल्लू तुझ्यावर मला खूप प्रेम करायचं आहे
- नारायण निमजे - बुलडाणा
narayannn007@yahoo.co.in

0 टिप्पण्या