पालम पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी,श्री मधुकरराव कदम यांनी पदभार स्वीकारल्या नंतर,त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने, उत्साहात सत्कार करण्यात आला.

 



पालम पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी,श्री मधुकरराव कदम यांनी पदभार स्वीकारल्या नंतर,त्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने, उत्साहात सत्कार करण्यात आला.



पालम प्रतिनिधी 

यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले,श्री शिसोदे यांची बदली झाल्यानंतर,श्री मधुकरराव कदम यांची पालम पंचायत समितीच्या,गटविकास अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


विशेष म्हणजे, श्री.कदम यांनी यापूर्वीही पालम पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले आहे.त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे,


लोकाभिमुख कामकाजामुळे आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे पालम तालुक्यात त्यांच्याबद्दल विशेष आत्मीयता आहे.याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते,


विजय कदम, कैलास घातले, आपू कदम, हरी भक्त परायण,शेषराव सोपणे महाराज, बालाजी साखरे तसेच मित्रमंडळ यांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात श्री. मधुकरराव कदम यांचा,


पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना श्री. मधुकरराव कदम यांनी सांगितले की, 


शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्यास प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही नागरिकाला किंवा लाभार्थ्याला अडचण येऊ नये यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील.



तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी,अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे,असे आवाहन ही त्यांनी केले.



या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अंभोरे सर, घोडके सर, हणवते सर तसेच पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या