शालेय समिती अध्यक्ष पदी संतोष पाटील तर उपाध्यक्ष पदी उमेश सुरवसे.
उमरगा प्रतिनिधी :- उमरगा तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी संतोष पाटील तर उपाध्यक्ष पदी उमेश सुरवसे यांची निवड करण्यात आली .
शालेय व्यवस्थापन समिती ची बैठक दिनांक २३ जुलै २०२४ रोजी विस्तार अधिकारी जोशी साहेब तसेच केंद्रप्रमुख अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली .तर या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एस के सुरवसे ,व पोलिस पाटील ईश्वर सुरवसे उपसरपंच सिराज शेख ग्रामपंचायत सदस्य गिरमल दलाल यांची उपस्थिती होती .
यावेळी प्रत्येकी वर्गांमधून प्रतिनिधित्व देण्यात आले तर अध्यक्षपदासाठी दोन पालक इच्छुक असल्याने निवड प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली यामध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून निवड करण्यासाठी दोन पालकांनी अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितल्यामुळे निवडणूक घेण्यात आली.
यामध्ये अध्यक्ष पदी संतोष बाळासाहेब पाटील यांना सहा मते पडली आणि त्यांचा एक मताच्या फरकाने विजय झाला तर तर अहमद तांबोळी यांना पाच मते पडली तर उपाध्यक्षपदी उमेश सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील पालकांमधून ११ सदस्य निवड करण्यात आले होते यामधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली यावेळी एक ग्रामपंचायत सदस्य तसेच शिक्षक तज्ञ म्हणून संजय पाटील यांची निवड करण्यात आली तर एक शिक्षक तसेच सचिव म्हणून मुख्याध्यापक साळुंखे मॅडम यांची निवड करण्यात आली यावेळी सदस्य पदी रामचंद्र सुरवसे, पठाण ,उपसरपंच सिराज शेख विठ्ठल सुरवसे ,तम्मा पाटील ,बंडु राठोड ,अहमद तांबोळी,अमर यमगर ,निळकंठ राठोड , यांची निवड करण्यात आली तर या वेळी शिक्षकांच्या वतीने नुतुन शाळा व्यवस्थापन समिती च्या सत्कार करण्यात आला तर विस्तार अधिकारी जोशी साहेब पहिल्यांदा पेठसांगवी येथील शाळेत आल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला .
या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष एस के सुरवसे यांनी शाळा व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन केले.या वेळी सुत्र संचालन चौधरी यांनी केलेतर आभार स्वामी यांनीमानले .या वेळी संतोष साखरे ,सत्यपाल भंडारे,लक्ष्मन सुरवसे ,गंगाधर कांबळे,कलिम शेख,मज्जु शेख ,विश्वनाथ कुंभार तसेच सर्वच पालक यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या