घरोघरी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करा – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन

 

घरोघरी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करा – गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे आवाहन



परभणी प्रतिनिधी

गौरक्षक सेना, वीर वारकरी सेवा संघ आणि राष्ट्र जन फाउंडेशन, परभणी यांच्या वतीने श्रीराम भक्त श्री हनुमान मारुती जयंती निमित्त घरोघरी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व हनुमान भक्त, श्रीराम भक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांना आवाहन केले आहे.

हनुमान जयंती निमित्त प्रत्येकाने आपल्या घरी मारुतीरायाच्या प्रतिमेचे पूजन करावे. तसेच परिसरातील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेऊन नारळ, शेंदूर, फुलांचा हार, फुटाणे, गूळ अर्पण करून सेवा करावी. यासोबतच



 हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र, बजरंग बलीची आरती, तसेच "ॐ हनुमंते नमः", "जय श्रीराम", "ॐ महारुद्र हनुमान नमः" या मंत्रांचा जप करून अभिषेक व पूजा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक मंगळवार व शनिवारी हनुमान सेवा करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हिंदू संस्कृती जपण्यासाठी घरोघरी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच पशुपक्ष्यांची सेवा करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. गोमाता, माकड, वानर तसेच पक्ष्यांसाठी परिसरात पाणवठे तयार करणे, फळझाडे व फुलझाडांची लागवड करणे, तसेच पशुपक्ष्यांचे संरक्षण करणे हीच खरी हनुमान भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

हनुमान जन्मोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजात सेवा व संस्कार रुजवण्याची संकल्पना सर्वांनी स्वीकारावी, असे आवाहन गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले आहे.

जय श्रीराम | जय बजरंग बली | जय हनुमान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या