गोमातेच्या सेवेसाठी नगरसेवक विजयराव भालेराव यांचा आदर्श घ्यावा – नितीन जाधव गोगलगावकर
परभणी प्रतिनिधी :- महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सर्व नगरसेवकांनी गोमातेच्या सेवेसाठी वार्ड क्रमांक १५ चे नगरसेवक विजयराव भालेराव यांच्यासारखा आदर्श घ्यावा, असे आवाहन गौरक्षक सेना मराठवाडा विभागीय अध्यक्ष व गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले आहे.
दक्षिण शिवराम नगर येथील संकट मोचन हनुमान मंदिराच्या बाजूला मागील तीन–चार दिवसांपासून एक गोमाता आजारी अवस्थेत होती. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक विजयराव भालेराव यांनी तत्काळ दखल घेत पशुवैद्यकीय डॉक्टरांची व्यवस्था केली. पशुवैद्यकीय डॉ. जाधव यांनी सकाळी ९ वाजता त्या ठिकाणी येऊन गोमातेवर सलाईन, औषध गोळ्या देत योग्य उपचार केले. या उपचारांमुळे सध्या गोमातेची प्रकृती सुधारत असून ती लवकरच पूर्णपणे बरी होईल, अशी माहिती देण्यात आली.
या वेळी श्रीकांत पांडे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर गोमातेबाबतचा संदेश व्हॉट्सॲप, फेसबुकसह सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला होता. त्यामुळे सोशल मीडियाचे सामाजिक कार्यातले महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
परभणी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व
नगरपरिषदांतील नगरसेवकांनी शिवसेनाचे नगरसेवक विजयराव भालेराव यांच्यासारखे पुढाकार घेऊन गोसेवा व गोमातेची सेवा करावी, हीच काळाची गरज असल्याचे मत नितीन जाधव गोगलगावकर यांनी व्यक्त केले. भविष्यातही अशीच समाजोपयोगी सेवा त्यांच्या हातून घडो, अशी प्रार्थना करत “जय गोमाता” असा जयघोष करण्यात आला.
ही माहिती गौरक्षक सेना मराठवाडा विभागीय अध्यक्ष नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


0 टिप्पण्या