भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


परभणी प्रतिनिधी :- सप्तशृंगी पान मंदिर, वसमत रोड, परभणी येथे गौरक्षक सेना परभणी यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

सप्तशृंगी पान मंदिराचे संचालक व गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष योगगुरू चंपालाल देवतवाल ठाकूर हे गेल्या ४० वर्षांपासून २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे व १७ सप्टेंबर हे राष्ट्रीय दिन उत्साहात साजरे करत आहेत. त्याच परंपरेनुसार यंदाही भारतीय प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२6) भव्य व दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणा देत राष्ट्रभक्तीपर वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास गौरक्षक सेना मराठवाडा विभाग, देवगिरी प्रांत अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर, महानगरसेवक अमोल जाधव, बालकलाकार रुद्राक्ष आवटे, रितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सप्तशृंगी पान मंदिराचे संचालक व गौरक्षक सेना परभणी जिल्हाध्यक्ष योगगुरू चंपालाल देवतवाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या