लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका मोलाची प्रामाणिक पत्रकारांमुळे अनेकांना मिळतोय न्याय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड सा.कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे थाटात प्रकाशन

 लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका मोलाची प्रामाणिक पत्रकारांमुळे अनेकांना मिळतोय न्याय वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब  गायकवाड सा.कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे थाटात प्रकाशन 


सोलापूर प्रतिनिधी :-
जन सामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन  डॅशिंग म्हणून ओळखले जाणारे विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दादासाहेब गायकवाड (साहेब) यांच्या हस्ते  करण्यात आले  यशवंत पवार हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून वृत्त पत्र चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य पणाला लावलं आहे  महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका अतिशय मोलाची ठरली असून पत्रकारांचे दुःख व्यथा अडचणी जाणून घेऊन आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून यशवंत पवार यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले आहेत  लोकशाहीत वृत्तपत्रांची भूमिका अतिशय मोलाची असून प्रामाणिक पत्रकारांमुळे अनेक विषयाना वाचा फुटते असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी सा. कार्यसम्राट च्या दिवाळी अंक प्रकाशन वेळी केलं असून साप्ताहिक कार्यसम्राट च्या लेखणीने आजवर निरपेक्ष निर्भीड व परखड मत प्रशासन दरबारात मांडून अनेक प्रश्नाना वाचा फोडली असल्याचे सांगत सा कार्यसम्राट वृत्तपत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सा कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या