कौडगाव झेड.पी. शाळेने गंगाखेड शिक्षण विभागाची उंचावली मान :- गटशिक्षणाधिकारी शशिकांत मुंढे
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड तालूक्यातील जि.प. परभणी च्या व क्रिडा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या गंगाखेड तालूका स्तरीय खो खो 14 वर्ष वयोगटातील जि प प्रा शा कौडगाव च्या मुली व मुले या दोन्ही संघांनी तालूक्यातून प्रथम क्रमांक पटकावून यशाचा पताका फडकावला व जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवून तिथेही मुलींच्या संघाने बाजी मारत तीसरा क्रमांक पटकावला त्या बद्ल सर्व विजयी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वांचे खेड्यातून येवून यशाच्या पदकात आपले नाव कोरले
त्या बद्दल विजयी विद्यार्थी मुले/ मुली,मार्गदर्शक शिक्षक श्री संभाजी जमदाडे, श्री विष्णु घुले,श्रीमती शिवमाला लांडगे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व सदस्य ,गावकरी ग्रा पं चे सरपंच व सदस्य व पालक व सर्वांचे कौतूक करून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
कौडगाव ही इसाद केंद्रातील आदर्श गुणवत्ता संपन्न जिल्हा परिषद शाळा आहे.. येथील शिक्षक व विद्यार्थी विविध नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून कौडगाव एक वेगळा पॅटर्न तयार करण्याच्या प्रयत्नात असतात.. सर्व बाबी बरोबरच आपण क्रिडा क्षेत्रातही उतरले पाहिजे अशा शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनामुळे या वर्षी मुले मुली 14 वयोगटातून दोन्ही संघ पुर्ण तयारी निशी दि 03/10/2025 रोजी पि एम श्री शाळा मन्नाथ नगर गंगाखेड येथे संपन्न झालेल्या खो खो च्या स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही टिम ने आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडवून अतिशय जिद्दीने अटीतटीच्या सामन्यात सर्व सहभागी टिम यांना हरवून तालूक्यातून दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरीय स्पर्धेत प्रवेश केला. व त्या जिल्हा स्तरीय स्पर्धा दि 04/10/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाविद्यालय परभणी येथील मैदानावर पार पडलेल्या या फायनल मॅच मध्ये कौडगाव शाळेच्या मुलीच्या संघाने तृतीय येण्याचा मान पटकावला व मुलांच्या संघास निसटता पराभव स्विकारावा लागला. एका खेड्यातील जि.प. शाळेचे या मानाच्या विजयावर नाव कोरले आणि गंगाखेड शिक्षण विभागाची मान उंचावली आहे असे प्रतिपादन गंगाखेड शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री शशिकांत मुंढे यांनी करून त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री एकनाथराव नागरगोजे, श्री गजानन लोळे,श्री बालाजी दराडे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर मुंढे,केंद्रीय मुख्याध्यापक श्री रामकिशन लटपटे, गंगाखेड तालूका क्रिडा संयोजक श्री विलास राठोड,क्रिडा शिक्षक श्री.धनराज मुंढे,श्री जयदीप फड,क्रिडा शिक्षक श्री.माणिक नागरगोजे, व सर्व क्रिडा शिक्षक संयोजन समितीच्या आणि क्रिडा प्रेमी यांच्या वतीने सर्व स्तरातून कौडगावचे विद्यार्थी,शाळेतील मार्गदर्शक शिक्षक सर्वांचे कौतूक होवून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल बोलताना विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक म्हनाले की आम्ही गुणवत्ता पॅटर्न कौडगाव बरोबरच क्रिडा क्षेत्रात ही आमचा पॅटर्न तयार करण्यासाठी सर्वांनी तयारी निशी या खो खो स्पर्धेत भाग घेतला व आम्हाला गंगाखेड तालूक्यातून मुले/मुली 14 वयोगटातून दोन्ही संघांनी प्रथम क्रमांक पटकावत आला व जिल्हा स्तरावर प्रवेश मिळवून जिल्ह्यातून मुली 14 वर्षे वयोगटातून तिसरा क्रमांक मिळविला.. यावर आम्ही थांबनार नसून पुढील वर्षी आम्ही कौडगाव झेड पी शाळेचे नाव जिल्ह्यातही उत्तुंग कामगिरी दाखवून पहीला नंबर मिळवू व विभाग, राज्य स्तरावर कौडगाव व गंगाखेड तालूक्याचे परभणी जिल्ह्याच्या नावाची अथक परिश्रमाने नोंद करू तो पर्यंत आम्ही थांबनार नाही अशा भावना क्रिडा मार्गदर्शक श्री संभाजी जमदाडे, श्री विष्णु घुले, श्रीमती शिवमाला लांडगे यांनी बोलताना व्यक्त केल्या.
या जिल्हा परिषद शाळेच्या यशामुळे गंगाखेड व परभणी जिल्ह्यातील शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात एक आनंदाचे वातावरण निर्माण होवून आम्ही पण क्रिडा क्षेत्र व इतर कोणत्याही उपक्रमात उतरून आपल्या शाळेचे तालूका व जिल्ह्याचे नाव मोठे करू शकतो. असे सुर उमटताना दिसत आहेत.नक्कीच पुढील वर्षी सर्व क्रिडा सामन्यात जास्तीत जास्त शाळा सहभागी होण्याच्या व आपले विद्यार्थी चमकविण्याच्या दिशेने वाटचाल करतील अशा सर्वच स्तरातून चर्चा ऐकायला मिळत आहेत.




0 टिप्पण्या