आमदार "रत्नदीप" पुरस्कार सोहळा-2025 एक ऐतिहासिक समारंभ..! साई वृंदावन लाॅन्स गंगाखेड येथे संपन्न..
वृत्तांकन माधव लातुरे [मामला] :- "रत्नदीप"आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 2025 व भव्य शिक्षण परीषद कार्यक्रमास दोन हजाराच्या वर शिक्षक बंधू भगीनीं,अंगणवाडी सेविका व मदतनीस, शिक्षणप्रेमी,अधिकारी व पदाधिकारी यांची अलोट गर्दी... दिमाखदार,सुंदर, देखणा सोहळा 12 ऑक्टोबर रोजी संपन्न...
आमदार "रत्नदीप" आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 ने गंगाखेड, पालम,पुर्णा तालुक्यातील 81 आदर्शांच्या कार्याचा गुणगौरव करून त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल,मानाचा फेटा श्रीफळ,पुष्पगुच्छ व प्रत्येक सत्कारमुर्ती सोबत लाडक्या बहीणीसाठी पैठणी साडी भेट देवून सन्मानीत करण्यात आले.
"ज्ञानदीप प्रज्वलीत करणार्या गुरूजनांना गौरवितो हा रत्नदीप"
गंगाखेड/पालम/पुर्णा प्रतीनिधी :-संत जनाबाई नगरीत 12 ऑक्टोबर रोजी आमदार "रत्नदीप" आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा-2025 व भव्य शिक्षण परीषद संपन्न झाली...या सोहळ्याचे आयोजन कर्तव्यदक्ष मा.आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब गंगाखेड विधानसभा यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. जिल्हा परिषदे मार्फत तालुका स्तरावरील पुरस्कार काही वर्षांपुर्वी चालू होते.मात्र ते कालांतराने बंद पडले आहेत. ते चालू व्हावेत अशी मागणी अनेक शिक्षक संघटना कडून सतत करण्यात येत होती.अनेक वर्षे पाठपुरावा करूनही याकडे उच्चस्तरीय अधिकारी व पदाधिकारी यांनी लक्ष न दिल्याने ते आता ही बंदच आहेत..ही मागणी घेवून गंगाखेड तालुक्यातील काही शिक्षकांनी मा.आमदार गुट्टे साहेब यांची भेट घेण्याचे ठरवून ही सर्व चर्चा मा.श्री बालाजी मुंढे जिल्हा संपर्कप्रमुख मा.आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ परभणी याचे सोबत केली.कार्यतत्पर श्रीयुत बालाजी मुंढे यांनी ही शिक्षकांची मागणी एकदम रास्त असल्याने आमदार गुट्टे साहेब यांचे जवळ ती मांडून या पुरस्कार वितरण सोहळ्याची गरज उद्देश, उद्दिष्ट,भुमीका आणि सर्व बाबींवर तज्ञ विचारवंत व शिक्षण विभाग गंगाखेड यांचे सोबत सकारात्मक सांगोपांग,सर्व मुद्दे, निकषांवर चर्चा केल्यानंतर मा.आमदार साहेब यांनी ह्या सोहळ्यास हिरवा कंदील दिला.हा सोहळा एका गंगाखेड तालुक्यासाठी न करता गंगाखेड विधानसभेतील तीनही तालुक्यातील अंगणवाडी सेविका, प्राथमीक,पदविधर मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक,केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्र स्टाफ हे शिक्षण विभागात अथक परिश्रम घेवून वाडी,वस्ती,तांडा, खेड्यापाड्यात प्रतिकूल परिस्थितीत ही काम करीत आहेत.. काही जिल्हा परिषद शाळांत पालक यांची निष्क्रियता व इंग्रजी शाळांकडे वाढलेला कल त्या मुळे खालावत असलेली पटसंख्या ही लक्षात घेवून आणि या सरकारी खाजगी शाळांमध्ये अनेक शिक्षक, अंगणवाडी सेविका आदर्श कार्य करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित करणे गरजेचे आहे व यामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी गुणवत्ता संपन्न बनतील व विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहचून एक समृद्ध देश घडेल, देशाचे भावी आदर्श आधारस्तंभ हे सर्वगुण संपन्न असतील.करीता या पुरस्कारामुळे अथक आदर्श कार्य करीत असलेल्या गुरूजनांना प्रोत्साहन मिळेल व यामुळे इतरही सर्व शिक्षक बंधू भगीनीं व अंगणवाडी ताई आपापल्या कामाला लागतील.या उदात्त विचाराने प्रेरित होवून शिक्षक,शाळा व विद्यार्थी गुणवत्ता संपन्न होतील.करिता या बाबत मुख्य आयोजन, नियोजन व संयोजन आणि इतर समित्या स्थापन करून सर्वजन तयारी करा. काय तो खर्च आम्ही करू असे संकेत मा.गुट्टे साहेब यांनी दिले ..
हा कार्यक्रम देशाचे माजी राष्ट्रपती तथा शिक्षक व शिक्षणतज्ञ डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 05 सप्टेंबर या वाढदिवसानिमित्ताने करण्याचे संकेत दिले आणि तो सोहळा 28 सप्टेंबर ला घेण्याचे ठरले... सर्व तयारी होऊनही त्या तारखेला मुसळधार पाऊस चालू असल्याने व सर्वत्र पुरजन्य परिस्थिती, शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले, अतिवृष्टीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाल्याने मा.आमदार साहेब व उच्च अधिकारी,संबंधित कर्मचारी हे शेतकरी व नुकसान ग्रस्त जनता यांना मदत करणे या कामी व्यस्त होते.सर्व गरजूंना शासनाची मदत मिळवून देईपर्यंत हा आनंदाचा सोहळा घेणे उचित होणार नाही. आपण सर्व जन दु:खीतांच्या मदतीला धावूया या उच्च हेतूने हा कार्यक्रम रद्द करा असे संकेत मा.आमदार साहेब यांनी संयोजन समितीस दिल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.आणि शेतकरी व नुकसान ग्रस्तांना मुख्यमंत्री यांनी मदत जाहीर केल्याने तो रद्द झालेला कार्यक्रम 12 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळीच्या सुट्टी अगोदर घेण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब हे होते.तर कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. जिवराज डापकर उपविभागीय अधिकारी गंगाखेड हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. संदीप घोन्सीकर उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जिल्हा परिषद परभणी, मा.श्रीमती उषाकिरण श्रृंगारे तहसीलदार तथा तालूका दंडाधिकारी गंगाखेड,एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गंगाखेड मा. श्री.उदयसिंग शिसोदे पालम,मा.श्री.मधुकर कदम गंगाखेड, मा.श्रीमती मनीषा काळे पूर्णा, गटशिक्षणाधिकारी मा. श्री.शशिकांत मुंढे गंगाखेड,मा.श्री.बालजी कापसीकर पुर्णा, मा. श्री.सुभाष आम्ले पालम,सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी,संपर्क कार्यालयाचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, स्विय सहाय्यक श्री.विठ्ठल सातपुते,आणि ज्यांच्यावर ह्या कार्यक्रमाची मा. आमदार साहेब यांनी जवाबदारी सोपवली होती ते श्री.प्रभाकर सातपुते मिडीया प्रमुख संपर्क कार्यालय गंगाखेड आणि तीनही तालूक्यातील 30 केंद्रप्रमुख,20 अंगणवाडी बिट सुपरवायझर,(2000) दोन हजाराच्या वर शिक्षक बंधू-भगीनीं, अंगणवाडी सेविका व मदतनीस,सत्कारमुर्ती व यांचे कुंटूबीय, मित्रपरिवार, शिक्षणप्रेमी,शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी,सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम मा. आमदार गुट्टे साहेब व सर्व मान्यवर,पाहुणे यांचे केंद्रप्रमुख श्री. माणिक नागरगोजे यांच्या नियोजनाखाली लेझीम आणि हलगी च्या तालात जिल्हा परिषद प्रशाला गंगाखेडच्या मुलींनी सुंदर अशा महाराष्ट्रीयन साडीच्या पेहरावात श्री. जयदीप फड यांच्या मदतीने,लेझीम पथकाचे डायरेक्टर तथा उत्कृष्ट हलगी वादक श्री.आर.एफ.राठोड मार्गदर्शनाखाली व त्यांचे हालगीवादक सहकारी यांच्या सोबत लेझीम पथकाचे संचलन मंगल कार्यालयापर्यंत करण्यातआले.मंचावर आरंभी मान्यवर व पाहुण्यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करून देशाचे माजी राष्ट्रपती तथा शिक्षक डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांची जयंती आपण सर्व जन शिक्षक दिन म्हणून साजरी करतो आणि त्याच निमित्ताने हा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय असे, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले,महीलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.आणि स्वागत गित सरस्वती विद्यालय गंगाखेड च्या मुलींनी स्वागतम् सुस्वागतम् हा मानाचा मुजरा या गिताने केले.
प्रास्ताविक गंगाखेड चे आदर्श गटशिक्षणाधिकारी मा.श्री.शशिकांत मुंढे यांनी केले तर या पुरस्कार वितरण सोहळ्याचा उद्देश, उद्दिष्ट व भुमीका जिल्हा संपर्कप्रमुख मा श्री बालाजी मुंढे मा गुट्टे काका मित्रमंडळ परभणी यांनी अतिशय सुत्रबध्द मांडणी करीत केले.या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने ठेवण्यात आलेली भव्य शिक्षण परीषद या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजेगाव ता.गंगाखेड येथील सबंध परभणी जिल्ह्यात व राज्यात गाजत असलेला गुंजेगाव गुणवत्ता व स्वच्छ शाळा सुंदर शाळा पॅटर्न काल,आज आणि उद्या,हा पॅटर्न उदयास कसा आला यावर तेथील माजी मुख्याध्यापक,आजी आदर्श केंद्रप्रमुख तथा जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम यांचे जाहीर व्याख्यान झाले. सोहळ्यात पुढे मा. श्री.किशन भोसले गंगाखेड विधानसभा प्रमुख गुट्टे काका मित्रमंडळ,मा.श्री.संदीप घोन्सीकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प.परभणी,मा. जिवराज डापकर उपविभागीय अधिकारी गंगाखेड व शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ते मा.आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांचे अध्यक्षीय सविस्तर भाषण झाले. त्यांनी हा रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मी हयात आहे तो पर्यंत व माझे माघारी पण चालू राहील असे सांगून हा सोहळा म्हणजे माझ्या जिवनातील सर्वांत जास्त आनंदाचा अविस्मरणीय क्षण असल्याचे जाहीर केले. व शाळा,शिक्षक व विद्यार्थी यांची कोणतीही अडचण असल्यास माझेशी संपर्क करावा ती अडचण तत्काल सोडविली जाईलअसेही अभिवचन दिले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात आदर्श कार्य करणार्या अंगणवाडी सेविका, बि.आर.सी.स्टाफ, प्राथमीक,पदविधर, मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक,केंद्रप्रमुख व काही शिक्षक यांना विशेष अशा 81 गुरूजनांना "रत्नदीप" पुरस्काराने गौरविण्यात आले.या सोहळ्याचे अतिशय अभ्यासपूर्ण असे बहारदार सुत्रसंचालन श्री.माधव लातूरे,आदर्श शिक्षिका श्रीमती इंदुमती कदम यांनी केले.तर उपस्थित सर्वांचे आभार आदर्श केंद्रप्रमुख डॉ विलास जोशी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास आलेल्या सर्वांचे मनोरंजन शेख इमाम गंगाखेड यांनी आपल्या सुंदर, वजनदार,
कर्णमधुर देशभक्ती गित,भावगीत व इतर शैक्षणिक व भावविश्वातील चुटकुल्यांनी आपल्या आवाजात केले.तसेच अष्टपैलू शिक्षक श्रीयुत नवनाथ चाटे गुरूजी यांनी शालेय विद्यार्थी, शिक्षक व नागरिक आणि मा.आमदार यांच्यासाठी अभिनयासह सुंदर गीत सादर केले व प्रेक्षकांची टाळ्यांच्या रुपात दाद मिळवली..
हा रूबाबदार, देखणा कार्यक्रम करण्यासाठी आयोजन व संयोजन समीती व इतर नैमित्तिक समीत्या यांनी आहोरात्र परिश्रम घेतले.या मुळेच हा दिमाखदार,उत्कृष्ट,न भुतो न भविष्यती असा ऐतिहासिक आमदार "रत्नदीप"आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा-2025 व भव्य शिक्षण परीषद मोठ्या थाटात संपन्न झाली.
आता हा पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी होणार असल्याने सर्व उपस्थितांमध्ये एक आनंदाचे वातावरण होते.या समारंभामुळे सर्व आदर्श काम करणारे सत्कारमुर्ती यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाली आणि यांची प्रेरणा घेवून पुढील वर्षीच्या रत्नदीप पुरस्कार साठी मोठ्या हुरूपाने सर्व शिक्षक बंधु-भगीनी,अंगणवाडी सेविका,बिट सुपरवायझर,गटसाधन केंद्र स्टाफ,सर्वजन कामाला लागतील. एकुणच सर्व शाळा, शिक्षक,विद्यार्थी गुणवत्ता संपन्न तयार होवून प्रत्येक शाळा शिक्षक व विद्यार्थी आदर्श होवून येथे देशाचे भावी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी,आधारस्तंभ घडतील असा सूर गंगाखेड,पालम,पूर्णा तालुका व सबंध परभणी जिल्ह्यातून ऐकावयास मिळत आहे..आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा-2025 व भव्य शिक्षण परीषद एक सुंदर, नियोजनबध्द,पुर्व तयारीने,एवढी अलोट गर्दी होऊनही एकदम शिस्तीत व शांततेत मोठ्या आनंदात संपन्न झाला.म्हणून आयोजन,संयोजन व इतर समित्या मधील सर्व सदस्य,मार्गदर्शक, तंत्रस्नेही या सर्वांचे प्रत्यक्ष व मिडीयाच्या माध्यमातून तोंडभरून कौतुक करून पुढील कार्यास शुभकामना देण्यात येत आहेत...! आणि गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ. रत्नाकरराव गुट्टे साहेबांनी आपल्या सर्व आदर्श विकास कामाबरोबरच हाही "ज्ञानदीप प्रज्वलीत करणार्या गुरूजनांना गौरवितो हा रत्नदीप" हा अत्यंत सुंदर,अतिशय नियोजनबद्ध,सर्व आदर्शांना गौरवीत करून मानसन्मान करण्याचा नवीन उपक्रम चालू केल्या बद्दल कार्यसम्राट, विकासाचा अनुशेष भरून काढणारे व शिक्षण,शाळा,
गुरुजनांना सन्मानीत करणारे,दातृत्व अंगी असणारेआमदार म्हणून मा.रत्नाकर गुट्टे साहेब यांचे सर्वत्र आभार व्यक्त केले जात आहेत... शेवटी या दिमाखदार सोहळ्याची नोंद परभणीच्या इतिहासात झाली याचा अभिमान व गर्व सर्वांना वाटतो आहे.
वृतांकन :- श्री माधव लातुरे (मामला)








0 टिप्पण्या