पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मिडीयाने केला निषेध
पालम प्रतिनिधी :- त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने करण्यात आली. मंगळवार (दि.२३ तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदनामार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली. यावेळी या हल्याचा पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला.
शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेले झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिवीगाळ करीत मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुगणालयात उपचार सुरू आहे या निवेदनावर भास्करराव लांडे,धोंडीराम कळंबे, शिवाजी शिंदे, गुनवंत सराफ, चांद ताबोळी बाळासाहेब फुलफगार ,गोविंद सोलेवाड रुक्कमाजी गिणगिणे , अवधुत जाधव, मोतीराम शिंदे, विनोद कांबळे , संग्राम खेडेकर, प्रल्हाद पांचाळ, अंबादास ठाकुर भगवानराव करंजे ,शेख गौस, संग्राम खेडेकर , लक्ष्मण दुधाटे, शेषराव सोपणे मामा,संदिप पाटील, शरद पोले , अंकुश वाघमारे, केरबा बहीरवाड,


0 टिप्पण्या