श्री देशमुख यांचा सेवापुर्ती सन्मान व गौरव सोहळा थाटात संपन्न.
दि 03/08/2025 रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता नैवद्यम हाॅटेल फंक्शन हाॅल उदगीर येथे सेवापुर्ती कार्यक्रम प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत.. श्री देशमुख सरांना सर्वांच्या भावनीक ऱ्हदयस्पर्शी सत्काराने निरोप..
उदगीर प्रतीनिधी :- रविवार दि 03/08/2025 रोजी उदगीर येथील मौलाना आझाद मराठी प्राथमीक शाळेचे प्राथमिक शिक्षक सन्माननीय श्री देशमुख वाहबमियाॅ खैरातमियाॅ नियतवयोमानानुसार हे दि31/07/2025 रोजी सेवानिवृत्त झाले. त्याच्या सेवापुर्ती चा गौरव व सन्मान सोहळा नैवद्यम हाॅटेल, कॅप्टन चौक उदगीर येथे शाळेचे मुख्याध्यापक व सर्व सन्माननीय शिक्षक वृंद व मित्रपरिवार यांच्या वतीने हा गौरव सन्मान व कृतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
या बहारदार व भावनीक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा श्री नजीब जहागीरदार अध्यक्ष नुरऊल हुदा सेवाभावी संस्था उदगीर हे होते तर ज्यांच्या उपस्थित व शुभहस्ते हा सत्कार ठेवला होता ते प्रमुख मार्गदर्शक व अतिथी म्हणून मा श्री मुजीब पटेल जहागीरदार साहेब संस्थापक अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नगर पालिका अहमदपूर हे होते..या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा श्री शुकूर जहागीरदार सचिव जनकल्याण ग्रामीण सेवाभावी विकास संस्था अहमदपूर तर शिक्षण विभाग उदगीर च्या वतीने मा श्री शिवराज थोटे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर व मा श्री बालाजी धमनसुरे केंद्रप्रमुख उदगीर, मा श्री मन्नान शेख माजी विस्तार अधिकारी पंचायत समिती उदगीर, मा श्री माधव लातुरे राज्य नेता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती, मा श्री शादुल शेख आदर्श शिक्षक तथा जिल्हा परिषद शिक्षक सोसायटी चे माजी उप चेअरमन तथा विद्यमान संचालक आणि अहमदपूर मधील दोन केंद्राचे केंद्रप्रमुख हे होते... प्रास्ताविक शाळेचे शिक्षक श्री फारूख काझी सरांनी मांडले तर मनोगतात शाळा, खाजगी मित्रपरिवार, नातलग व श्री हुडे सर यांनी श्री देशमुख सर यांच्या विषयी आपल्या भावना मांडल्या मंचावरील मान्यवरांपैकी श्री शादुल शेख आदर्श केंद्रप्रमुख , मन्नान शेख माजी विस्तार अधिकारी, श्री माधव लातूरे राज्य नेता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती ,श्री शुकुर जहागीरदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नंतर सत्काराला उत्तर देताना श्री देशमुख वाहबमियाॅ खैरातमियाॅ सरांनी आपल्या जिवाचा इतिहास सांगून मला मदत करणारे मा मुजीब पटेल यांचे व व माझ्या या सेवेच्या काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली व शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद या सर्वांचे मनापासून आभार मानले.पुढे श्री. नजीब जहागीरदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक तथा सत्कार मुर्ती चा शुभहस्ते सत्कार करणारे मा श्री.मुजीब पटेल जहागीरदार यांचे ही सविस्तर मनोगते सत्कार मुर्ती सन्माननीय श्री देशमुख यांच्या सत्कारानंतर संपन्न झाली.मान्यवरांचे व उपस्थित सर्वांचे आभार श्री मजीद जहागीरदार यांनी मानले.
मनोगतात श्री वाहबमियाॅ देशमुख यांचे परम मित्र केंद्रप्रमुख पं स अहमदपूर चे श्री शादूल शेख सरांनी सत्कार मुर्ती देशमुख यांच्या विषयी संपुर्ण इतिहास आपल्या बहारदार बोलीतून मांडला श्री माधव लातुरे राज्य नेता महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती यांनी सेवापुर्ती निमित्ताने मित्र देशमुख यांच्या विषयी बर्याचश्या सकारात्मक बाबी सांगून संस्थापक मा श्री मुजीब पटेल जहागीरदार यांनी एका कुटूंबाला आधार देवून एक घर बसवले या बद्दल आभार मानले व पुढील उत्तुंग कार्यास भरभरून शुभकामना दिल्या. मा श्री नजीब जहागीरदार कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी श्री वहाब देशमुख सरांनी तीस वर्षे वेळेचे बंधन पाळून सेवा दिली यांच्या सेवापुर्ती मुळे संस्थेत नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी बाकी सर्व शिक्षकांनी काम करावे असे सांगून श्री देशमुख व्ही के सरांना सेवानिवृत्ती निमित्ताने शुभेच्छा देवून पुढील आयुष्यासाठी शुभकामना दिल्या... शेवटी कार्यक्रमाचे मुख अतिथी संस्थापक अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नगर परिषद अहमदपूर मा श्री मुजीब पटेल जहागीरदार यांनी श्री देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला संस्थेचे नावलौकिक करण्यासाठी अथक परिश्रम केले.. तीस वर्षांत याची एकही तक्रार नाही.... मला यांच्या परिवारास आधार देता आला ही ईश्वराची कृपा आहे असे सांगून त्यांनी श्री देशमुख यांना सेवापुर्ती निमित्ताने शुभेच्छा देवून पुढील आयुष्यासाठी निरोगी, सुदृढ आरोग्य लाभो, यांना उदंड आयुष्य लाभो.अशा शुभकामना दिल्या आता पुढील आयुष्यात पती पत्नी व परिवार आयुष्याचा आनंद घ्यावा व आनखी पन्नास वर्षे आपण पेन्शन घ्यावी असे जिवन निरोगी जगावे असेही आपल्या मनोगतातून बोलताना सांगितले.
या यशस्वी झालेल्या कार्यक्रमासाठी मौलाना आझाद मराठी प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगीनीं व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले यावेळी श्री देशमुख व्ही के सर चापोलीकर यांचे सर्व कुटुंब, सर्व मित्रपरिवार, अधिकारी, पदाधिकारी, खाजगी दोस्त, नातलग, पाहुणे, निमंत्रित मान्यवर, जन्म भुमी चापोली चे असंख्य मित्रपरिवार उपस्थित होते एक शानदार, भावनीक आदर्श सेवापुर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात संपन्न झाला.




0 टिप्पण्या