निधन वार्ता भावपूर्ण श्रद्धांजली
बनवस प्रतिनिधी :- आपणा सर्वांना कळविण्यातअत्यंत दु:ख होत आहे की शिवैक्य कै.सिमंताबाई शिवलिंगप्पा ढेले यांचे प्रदिर्घ आजारानंतर वृद्धापकाळाने अकस्मीक निधन दि. 30/07/2025 वार बुधवार रोजी सायंकाळी ठिक :6:00वाजता बनवस येथे रहात्या घरी झाले आहे.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
कै सिमंताबाई शिवलिंगप्पा ढेले या मा.श्री. सदाशिवाअप्पा इरप्पा ढेले घनदाट मित्रमंडळाचे गंगाखेड विधासमभा मतदारसंघाचे प्रमुख,आणि श्री. विठ्ठलराव इरप्पा ढेले यांच्या चुलती यांच्या (काकी) होत्या. तसेच सुर्योदया सेवाभावी संस्था बनवस संचिलीत आचार्य विनोबा भावे प्राथमीक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेंडू (खुर्द), बनवस ता पालम जि परभणी या संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री.ज्ञानोबा शिवलिंगप्पा ढेले,आणि शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालम, जि.प.प्रा.शा.गुंजेगाव चे माजी आदर्श मुख्याध्यापक तथा केंद्र प्रा.शा.चाटोरी चे केंद्रप्रमुख श्री. व्यंकटराव शिवलिंगप्पा ढेले, आयर्लंड येथे कार्यरत असलेले इंजिनिअर श्री.गोविंद शिवलिंगप्पा ढेले,भगीनी सौ वर्षाताई यांच्या त्या मातोश्री होत्या.
ढेले परिवार बनवसकर यांच्या परिवारावर मातोश्रीं चे अचानक देहावसान झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ओढवलेल्या या अकस्मिक दु:खामुळे परिवारावर व गावभर, सर्वत्र शोककळा पसरली आहे..ढेले परिवारातील सर्वांना या दु:खातुन सावरण्याचे परमेश्वर बळ देवो अशी जगद्निर्मात्या ईश्वरास मनोभावे प्रार्थना...शिवैक्य कै. सिमंताबाई शिवलिंगप्पा ढेले यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मातोश्रींच्या पवित्र आत्म्यास ईश्वर चिर शांती देवो व सद्गती देवो हीच जगद्निर्मात्या ईश्वरास प्रार्थना.
अंत्यसंस्कार
दि 31/07/2025 रोजी दुपारी ठिक 1:00वाजता कै सिमंताबाई मातोश्री यांच्या पवित्र देहावर विधीपुर्वक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.याची सर्वांनी नोंद घ्यावी.
स्थळ :-स्वत:च्या शेतात बनवस ता.पालम जि.परभणी येथे अंत्यसंस्कार होतील
शोकाकुल
मा.श्री. सदावशिवअप्पा इरप्पा ढेले,श्री.विठ्ठलराव इराप्पा ढेले,मा.श्री.ज्ञानोबा शिवलिंगप्पा ढेले,मा.श्री.व्यकटराव शिवलिंगप्पा ढेले मा.श्री.गोविंदराव शिवलिंगप्पा ढेले,आणि ढेले परिवार व मित्रपरिवार,बनवस ता. पालम जि. परभणी
नोट :-बनवस हे गाव मरडसगाव ते माळेगाव (यात्रा) या रोडवर आहे.


0 टिप्पण्या