एक सामाजिक चळवळीतील पैलू,माणुसकीच प्रतिबिंब,श्री माधव लातुरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न...



एक सामाजिक चळवळीतील पैलू,माणुसकीच प्रतिबिंब,श्री माधव लातुरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न...



 परभणी प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती चे राज्य नेते तथा सामाजिक कार्यकर्ते एक आदर्श शिक्षक श्री माधव मन्मथ लातुरे यांचा 51वा वाढदिवस शिवकृपा गार्डन हाॅटेल, कोद्री रोड गंगाखेड येथे मोठय़ा थाटामाटात व हर्षउल्हासात साजरा मित्रपरिवार गंगाखेड /परभणी यांचे वतीने करण्यात आला.


    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा भगवानराव ठुले गटशिक्षणाधिकारी गंगाखेड यांनी भुषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री बी एस मुंढे, विस्तार अधिकारी श्री वसंतराव फूटके मुख्याध्यापक श्री सुरेश लटपटे, श्री रामकिशन लटपटे, श्री नारायणराव घनवटे सामाजिक कार्यकर्ते,श्री माधवराव चव्हाण,श्री ईरकर, श्री पांडुरंग आंधळे, आदर्श सुत्रसंचालक श्री माणिक नागरगोजे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री रामभाऊ फड, आनंदवन विद्यालय गंगाखेड चे आदर्श मुख्याध्यापक श्री विलास राठोड, उत्कृष्ट सुत्रसंचालक तथा आदर्श शिक्षक श्री दशरथ मुंढे, क्रिडा शिक्षक श्री पाळवदे सर, आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक श्री शिवाजी राठोड, श्री गोविंद मुंढे, श्री शाम गिरी सर, श्री दत्तात्रय परबत सर, श्री मंगनाळे सर, सिरसमचे श्री बाबुराव फड सर, श्री माधवराव फड सर..हजर होते..आणि आदर्श केंद्रप्रमुख श्री बालाजी दराडे, सन्माननीय धोंडीराम गुट्टे आणि कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन केलेले सन्माननीय भागवतराव कातकडे हे ही अवर्जून उपस्थित होते. 

   तसेच विशेष उपस्थिती म्हणून गंगाखेड तालूका वकील संघाचे अध्यक्ष मा.श्री मिलिंद क्षिरसागर,आमदार गुट्टे साहेब मित्रमंडळ यांचे सोशल मीडिया प्रमुख श्री प्रभाकर सातपुते, अॅड हनुमान जाधव, अॅड अनिल सावंत हे मान्यवर, मित्र इत्यादी अनेक शिक्षक, व इतर सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या