गंगाखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
गंगाखेड प्रतिनिधी :- गंगाखेड येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भव्य व्याख्यान,स्त्री शक्तीचा सन्मान,गौरव समारंभ, आणि विचारांची जागृती, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न.
गंगाखेड येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त गंगाखेड येथील पलसिद्ध स्वामी मठ देवस्थान सभागृहात एक भव्य व्याख्यानमाला आणि आदर्श महिलांचा गौरव समारंभ अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन महापुरुष जयंती समिती, भगवती मंदिर, शिवाजी चौक, गंगाखेड यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला शेकडो महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श जीवनकार्याचा जागर करण्यासाठी, सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्यासाठी आणि स्त्रीशक्तीच्या योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय रेखाताई गुट्टे यांनी भूषवले. उद्घाटन हभप तुळशीदास महाराज देवई माय संस्थान, नरळद-इरळद यांच्या शुभहस्ते पार पडले,स्वागताध्यक्षा म्हणून सौ.सिमाताई घनवटे या उपस्थित होत्या.
प्रसिद्ध वक्ते प्रा.महादेव सुरनर चाटोरीकर,धनंजय चिलगर,कुमारी शिवकन्या शिंदे,मनकर्णा वैद्य, अंकिता शिंदे आणि कुमार अनंता शिंदे यांनी राजमातांच्या कार्याचे विविध पैलू उलगडत स्त्रीशक्ती, न्याय, सामाजिक समतेचे महत्व यावर अत्यंत प्रभावी विचार मांडले. त्यांच्या भाषणांनी उपस्थितांमध्ये ऊर्जा आणि विचारजागृती निर्माण केली.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
गौरवप्राप्त महिलांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश होता:
पोलीस अधिकारी विमलताई पवार, महसूल क्षेत्रातील उज्ज्वलाताई मुळे, नगरपालिका कर्मचारी शिलाताई गौरकर, तसेच रेणुकाताई कर्हाळे, सुनिताताई गिराम, कविताताई अवचार,शितलताई शिंदे यांच्यासह अनेकांनी सन्मान प्राप्त केला.
याशिवाय अनुसया घनवटे, शोभाताई शेवाळे, लताबाई गायकवाड, अल्काताई तमखाने, सविताताई चव्हाण, आशाताई फड, दैवशालाताई डांगे, उज्ज्वला मुळे यांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मान्यवर महिलांमध्ये मंजुषाताई जामगे, वर्षाताई यादव, अश्विनी पिसाळ, मंगल बोडखे, सुवर्णमाला मोतीपवळे, ममता पैठणकर, मीनाताई मस्के, दैवशाला डांगे, शकुंतलाताई कुलकर्णी, मंजुषाताई दर्डा, लक्ष्मी आडे, माधुरी राजेंद्र, मायाताई कांबळे, शिल्पा वाघमारे, गीतांजली मंगरूळकर, शरयू पेकम, मंगल भिसे, अनिता भुमरे, शितल शिंदे, आस्मा पठाण, गुन्नास भाभी, शोभा बचाटे, लक्ष्मीबाई साळवे, अनुसया कुंडगीर, राणी राखे, निर्मला होनराव, प्रज्ञा कोटलवार, सुरेखा उदावंत, मीरा पेकम, संगीता गाढवे, सुशिलाबाई भुमरे, सुरेखा घनवटे, मायाताई सोरटे, रजनीताई मंगलगे, प्रतिभाताई बोडखे, छायाताई शिंदे, स्मिताताई देशमुख, साधना घनवटे, भिमाबाई घनवटे, गायत्री जगताप, मानसी घनवटे, रेणुका कराळे यांचा समावेश होता.
श्री माधव लातुरे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करून संपूर्ण वातावरण रंगतदार केले.
कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी श्री नारायणराव घनवटे (अध्यक्ष), श्री माधवराव चव्हाण (संकल्पक), बाबुराव पवार, प्रा. रामचंद्र पवार, सखाराम बोबडे, शिवाजीराव सुमारे, ईश्वर पिसाळ, पोलीस अधिकारी पुरुषोत्तम मुलगीर, सचिन जोशी, बाळासाहेब पारवे, नवनाथ शिंदे, अशोक शिंदे, बाळासाहेब चांदणे, नितीन कांबळे, गौतम हेंडगे, सर्जेराव घनवटे, भगवान घनवटे, इस्तेयाक अन्सारी यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. मिनाताई सोनवळकर, राणीताई राखे, निर्मलाताई होनराव, कल्पनाताई लांडे, अश्विनीताई शिंदे, शिलाताई रत्नपारखे या संयोजिकांनी उत्कृष्ट नियोजनाची जबाबदारी निभावली.
श्री सखारामजी बोबडे पडेगावकर यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमामुळे संपूर्ण गंगाखेड परिसरात अहिल्यादेवींच्या कार्याला उजाळा मिळाला, स्त्रीशक्तीला नवा आत्मविश्वास मिळाला आणि समाजहितासाठी प्रेरणा मिळाली.



0 टिप्पण्या