गटशिक्षणाधिकारी गंगाखेड श्री भगवान ठुले,दि. 30 जुन रोजी सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा
गंगाखेड प्रतीनिधी :- गंगाखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, कार्यतत्पर, शिक्षकप्रिय, विद्यार्थी प्रिय,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले आदरणीय भगवानराव श्रीराम ठुले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गंगाखेड हे नियत वयोमानानुसार वयाच्या 58 व्या वर्षानंतर दि. 30/06 /2025 रोजी सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने अनेक शाळा व विविध स्तरातून त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा सर्व मित्रपरिवार, शिक्षक बंधू भगीनीं देत आहेत.
त्यांचा सेवापुर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा दि 30/06/2025 रोजी जिल्हा परिषद प्रशाला सभागृह व भव्य मंडप गटसाधन केंद्र गंगाखेड जवळ जि परभणी येथे सकाळी 11:00 वाजता सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उदघाटक म्हणून मा. आ. डॉ. श्री. रत्नाकराव गुट्टे साहेब तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. श्री. विलास जोशी हे रहाणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुनिल पोलास शिक्षणाधिकारी जि. परभणी, मा. श्री. जिवराज डापकर उपविभागीय अधिकारी गंगाखेड, मा. श्री. दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड, मा. श्रीमती उषाकिरण श्रृंगारे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी तहसिल कार्यालय गंगाखेड, मा. श्री. अक्षय सुक्रे गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड, मा. श्री. हेमंत मुंढे वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णाल गंगाखेड, मा. श्री. जयंत सोनवणे मुख्याधिकारी नगर परिषद गंगाखेड हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख उपस्थिती म्हनून मा. श्री. नारायणराव ठुले माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पालम, मा. श्री. शिवाजीराव गायकवाड माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पालम,मा. श्री. शशिकांत मुंढे मुख्याध्यापक जि. प. हायस्कूल मुळी, मा. श्री. तुषार गोळेगावकर संस्थाचालक महामंडळ अध्यक्ष, मा. श्री. वसंतराव फूटके माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती गंगाखेड, मा. श्री. बालाजी मुंढे शिक्षण विस्तार अधिकारी दैठना ता. परभणी,मा. श्री. बालाजी दराडे शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख पंचायत समिती गंगाखेड, मा.श्री. गजानन लोळे विस्तार अधिकारी तथा केंद्रप्रमुख पंचायत समिती गंगाखेड, मा. डॉ. श्री. बालाजी ढाकणे प्राचार्य कै. शेषाबाई मुंढे महाविद्यालय गंगाखेड, मा. श्री. दिलीप जोशी प्राचार्य व्यंकटेश विद्यालय गंगाखेड,मा रावसाहेब कातकडे विस्तार अधिकारी पंचायत समिती जिंतूर, केंद्रप्रमुख मा. श्री एकनाथराव नागरगोजे , केंद्रप्रमुख मा. श्री. उत्तम सुरनर , केंद्रप्रमुख मा. श्री. विठ्ठलप्रसाद पवार, केंद्रप्रमुख श्री किशनराव कदम , केंद्रप्रमुख मा. श्री. वाल्मीक सानप,केंद्रप्रमुख मा. श्री. व्यंकटराव ढेले, केंद्रप्रमुख मा. श्री. रावसाहेब चंदे , केंद्रप्रमुख मा. श्री. सायस नाईकवाडे , केंद्रप्रमुख मा.श्री. मधुकर कांबळे, केंद्रप्रमुख मा. श्री. ज्ञानेश्वर मुंढे , केंद्रप्रमुख मा.श्री. शिवाजी चव्हाण
व गंगाखेड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व अस्थापनेतील अधिकारी व कर्मचारी, सरकारी व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच खाजगी व सर्व क्षेत्रातील मा. ठुले साहेबांचे चाहते शिक्षक बंधू भगीनीं इत्यादी जेष्ठ, लहान, थोर किमान 500 मित्रपरिवार उपस्थित रहाणार आहे. यावेळी सन्माननीय भगवानराव ठुले यांच्या सेवाकार्याचा सर्व उपस्थित पाहुणे मंडळी, मार्गदर्शक, खाजगी संस्था सर्व मुख्याध्यापक व कर्मचारी,सर्व सरकारी सरकारी शाळा मुख्याध्यापक व कर्मचारी यांचे वतीने गौरव /सन्मान करून त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व शुभकामना देण्यात येणार आहेत. या करीता मा ठुले सरांना शुभेच्छा व सदिच्छा, शुभकामना देण्यासाठी सर्व स्तरातील आदरणीय श्री भगवानराव ठुले सर यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार, आप्तस्वकीय, नातलग, सर्व क्षेत्रातील संबंधित स्नेही, अधिकारी, पदाधिकारी, यांनी आपल्या दैनंदिन कामकाजातून अमुल्य वेळ काढून कार्यक्रमास उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व मा. भगवान ठुले गटशिक्षणाधिकारी यांचे वतीने ठेवलेला सुरुची भोजनाचा मनसोक्त अस्वाद त्याच कार्यक्रमस्थळी घेवूनच कार्यक्रम स्थळावरून प्रस्थान करावे, अशी जाहीर विनंती ...



0 टिप्पण्या