श्री क्षेत्र सावंगी भुजभळ येथे दोन मंत्री महोदयांच्या उपस्थितीत किर्तन सोहळा.

 श्री क्षेत्र सावंगी भुजभळ येथे दोन मंत्री महोदयांच्या उपस्थितीत किर्तन सोहळा.

पालम प्रतीनिधी :- अहमदपूर तालूक्यातील खानापूर गावाचे पोलीस पाटील श्री राजकुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र सावंगी भुजभळ येथील गोदावरी पात्रातील रामायन काळात प्रभू श्री राम यांच्या पावन हस्ते स्थापीलेल्या जागृत शंभू महादेव मंदीरात सोमवती अमावस्या निमीत्त श्री शंभू महादेव पिंडीवर महाजलाभिषेक, दुग्धाभिषक,रूद्राभिषेक, किर्तन सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन दि २६/०५/२०२५ सोमवार रोजी श्री राजकुमार शिंदे व नारायणराव शिंदे खानापूर ता अहमदपूर व समस्त गावकरी सावंगी भुजभळ ता पालम यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे.*

      गोदावरी पात्रातील भक्तांना पावनार्या जागृत शंभूमहादेवाच्या मंदीरात सकाळी संत महंत यांच्या उपस्थितीत सर्व अभिषेक करण्यात येणार आहेत. नंतर दुपारी ०१ते ०३वाजनेच्या  वेळत हरी भक्त परायन वासकर परंपरा श्री क्षेत्र पंढरपूर येथील चैतन्य महाराज वासकर यांचे किर्तन होणार आहे. किर्तनानंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पुन्हा रात्री श्रीगुरू हरी भक्त परायन ज्ञानेश्वर माऊली (मोठे ) कदम श्री क्षेत्र आळंदी देवाची यांचे ०८ते १०किर्तनसेवा संपन्न होणार आहे याचा सावंगी भुजभळ व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी जाहीर विनंती आयोजक, नियोजक, संयोजक, व्यवस्थापक समित्या व  समस्त गावकरी यांच्या वतीने करण्यात येत आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा ना श्री बाबासाहेब पाटील साहेब, सहकार मंत्री तथा गोंदीया पालकमंत्री, तसेच मा ना सौ मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा परभणी जिल्हा पालक मंत्री, मा श्री बाळासाहेबजी जाधव माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा खा संजयजी जाधव साहेब परभणी जिल्हा, मा आ रत्नाकररावजी गुट्टे साहेब हे मान्यवर यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे..*

      *याच कार्यक्रमास ह. भ. प. बापुदेव महाराज बेलगावकर, अनंत महाराज खानापूर, रोहीदास महाराज मस्के गंगाखेड, ज्ञानेश्वर महाराज खानापूर, निवृत्ती महाराज शास्त्री, गंगोत्री आश्रम गंगाखेड, सुरेश महाराज गोढाळकर, रघुनंदन महाराज खानापूर, रोहन महाराज भिसे, माधव गोपाळे महाराज परळीकर, गोविंद महाराज कोष्टगावकर, अशोक महाराज खानापूर, माणिक महाराज शास्त्री गंगाखेड यांचीही उपस्थिती रहानार आहे. या महासोहळ्यास खानापूर किनगाव ता अहमदपूर व सावंगी भुजभळ पालम तालुक्यातील  पंचक्रोशीतील भावीक भक्तांनी उपस्थित राहून या दिवसभराच्या शंभु महादेव अभिषेक,किर्तन सोहळा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आयोजन व नियोजन व समस्त गावकरी सावंगी भुजभळ यांच्या वतीने करण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या