दोन आमदारांकडून ग्रेट भेट'! भाजप गट नेते यांच अभिनंदन थेट,
वृत्त संकलन पांडुरंग सोपणे :- गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी राज्याचे नेते आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबई येथील सागर या शासकीय निवासस्थानी आमदार राजेश दादा विटेकर यांच्यासह भेट घेऊन महायुतीला मिळालेल्या महाविजयाबद्दल मनस्वी अभिनंदन केले.
यावेळी आदरणीय फडणवीस साहेबांनीही गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघातून मिळालेल्या विजयाबद्दल दोघांचे अभिनंदन करत महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याबाबत आश्वासन दिले.
आमदार राजेश विटेकर व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे साहेब यांच्या या भेटीत पाथ्री विधान सभा व गंगाखेड विधान सभा मतदार संघात, विकासात्मक बदल करण्यात दोन्ही आमदार सक्षम व कर्तव्य राहून कामे करणार असा जनसामान्यात अत्मविश्वास व्यक्त होत आहे.


0 टिप्पण्या