तंटामुक्त समिती अध्यक्षपदी भिमराव ईचनर यांची प पुनर्नियुक्ती
पालम प्रतिनिधी :- तालुक्यातील भालकुडकी येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भिमराव धोंडीबा ईचनर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्यासह
गामरक्षक, दुर्गामाता व्यसन मुक्ती व वयोश्री समितीची निवड झाली आहे.
शुक्रवारी सदर निवडीसाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवचरणा मंगेश ढेपाळे होत्या. ग्रामविकास अधिकारी राजकुमार हिंगे, माजी सरपंच मंगेश दयाळ, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण, राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री मस्के, कर्मचारी नरवाडे उपस्थित होते. सभेत वयोश्री समिती अध्यक्षपदी बाजीराव देवराव दयाळ, सचिव धारबा नामदेव हाके बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच आदर्श गाव निवडबाबत ठराव घेण्यात आला.
0 टिप्पण्या