वेध बाप्पाच्या आगमनाचे,सुपतगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारणी जाहिर
उमरगा प्रतिनिधी ज्ञानेश्वर गौरव :- उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील श्री जय हनुमान सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी नागनाथ हेंडले, उपाध्यक्षपदी संतोष विभुते,सचिवपदी राजेंद्र लामजणे, खजिनदारपदी सुधाकर हेंडले, मिरवणूक प्रमुखपदी रतन लामजणे, निळकंठ लामजणे, ज्ञानेश्वर लामजणे, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जय हनुमान मंडळाचे मार्गदर्शक दत्तात्रय गिरी, राजाप्पा बिराजदार, मोहन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक घेण्यात आली.यावेळी "श्री "ची गणेशमूर्ती ही महेश राम लामजणे यांच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
या बैठकीत जय हनुमान सार्वजनिक गणेश मंडळाचे सदस्य शिवशांत झुरळे, मल्लाप्पा बिराजदार, आनंद झुरळे,व्यंकट लामजणे, राहुल लामजणे, रवी करके, महेश लामजणे, गंगाधर करके, खंडू हेंडले, नागनाथ लामजने, ज्ञानू लामजने, महादेव भोईटे यांच्यासह आदी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या