डोंबिवली करानो सावधान,गुणवत्ता पाहाण्यासाठी तांदुळ,कागद,अत्तर इत्यादी वस्तूचा वास घेऊ नका,डीसीपी के.आर.नागराजू गुन्हे शाखा मुंबई.

 डोंबिवली करानो सावधान,गुणवत्ता पाहाण्यासाठी तांदुळ,कागद,अत्तर इत्यादी वस्तूचा वास घेऊ नका,डीसीपी के.आर.नागराजू गुन्हे शाखा मुंबई. 



मुंबई प्रतिनिधीं :- डोंबिवली,मुंबई मध्ये सध्या तांदूळ विकणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. यामध्ये खास करून नऊवारी साडी नेसलेल्या महिला आहेत. त्यांच्या शेतातील तांदूळ आहे असे सांगून त्या तांदूळ विकत घेण्यास सांगतात. तांदुळाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांदुळाचा वास घेण्यास सांगतात व अशा प्रकारे तांदुळाचा वास देऊन वशीकरण करतात. वशीकरण केलेल्या व्यक्तीस घरातील रोख रक्कम, दागिने आणून द्यावयास सांगतात व त्यानंतर पोबारा करतात. सोसायटी किंवा इमारतीच्या बाहेर त्यांच्या रिक्षा उभ्या असतात. 



सोसायटीतील सर्व रहिवाशांना याद्वारे सावध करण्यात येत आहे. कोपरी गावात अशा घटना घडलेल्या आहेत. कृपया दारी आलेल्या अनोळखी व्यक्तींकडून काहीही खरेदी करू नका व अशा टोळ्या नजरेस पडल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.        

            जनतेला सतर्कतेचा पोलिस विनंती पुर्वक इशारा 

प्रिय मित्रांनो,कृपया लक्षात घ्या की एखाद्या इसमाने तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये किंवा इतर कोठे निर्मनुष्य ठिकाणी थांबवले आणि अत्तर व सेंटमध्ये आपल्याला रस आहे का आणि सँम्पल म्हणुन आपल्याला वास घेण्यास कागद दिल्यास त्याचा वास घेऊ नका, याचा वास येत नाही. हा एक नवीन घोटाळा आहे, ते लोक पेपर ड्रग्जसह सज्ज आहेत. त्याचा वास घेताच आपण बेशुध्द पडाल व आपले अपहरण होईल. आपण तेथुन ताबडतोब निघून जा. ते आपले अपहरण करू शकतील, लुटतील किंवा वाईट गोष्टी करतील.

हे ३ पेक्षा जास्त नामांकित मॉल्समध्ये घडले आणि ७ हून अधिक मुली बेपत्ता आहेत कृपया सर्व मित्रांना आणि कुटुंबात फॉरवर्ड करा. कृपया आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य वाचवा, वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून हे प्राप्त झाले आहे, नोंद घ्या आणि आपण संरक्षण करू इच्छित असलेल्या प्रत्येकास सूचना द्या.असे गुन्हे शाखा मुंबई डिसिपि के.आर.नागराजू यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या