शब्बीर खान, शेख मंजूर सेवानिवृत्त; कर्तव्यदक्ष बीएलओंची उणीव जाणवेल!

 शब्बीर खान, शेख मंजूर सेवानिवृत्त; कर्तव्यदक्ष बीएलओंची उणीव जाणवेल!



बीड प्रतिनिधी :- येथील जिल्हा परिषद शिक्षण विभागात सहशिक्षक पदावरून नियत वयोमानानुसार पठाण शब्बीर खान आणि शेख मंजूर हे दोन्ही सहशिक्षक सेवानिवृत्त झाले. दोघांच्या निवृत्ती प्रित्यर्थ शहरातील मीना फंक्शन हॉल येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेख इसाक, शेख फारुख, सेवानिवृत्त फौजदार मुहम्मद रफीक, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह अनेकांनी भेटून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे दोन्हीही शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बशीरगंज ते बार्शी रोड पर्यंत च्या परिसरातील वसाहतींमध्ये बीएलओ चे काम पाहत होते. या दोघांचेही काम एवढे तंतोतंत आणि वाखाण्याजोगे होते की, या परिसरात १८ वर्षे पूर्ण करून नवमतदार झालेल्यांची नावे ते जातीने घरोघरी फिरून मतदार यादीत नोंदवायचे, आलेले मतदान कार्ड घरपोच नेऊन द्यायचे तसेच मृत पावलेल्या मतदाराचे नावही मतदार यादीतून तेवढ्याच आठवणीने काढायचे. त्यांच्या या कामामुळे ते बशीरगंज, धांडे गल्ली, तेरवी लाईन, गणेश नगर, थोरातवाडी, आसेफ़नगर, विद्यानगर पूर्व, शहिंशाह नगर, सहारा कॉलनी, अक्सा कॉलनी, लक्ष्मण नगर, चंपावती नगर आदी परिसरात चांगले काम करणारे म्हणून दोघेही सुपरिचित होते. या दोघांच्या सेवा निवृत्तीने आता या परिसरात बीएलओ म्हणून या दोघांचीही कमतरता येथील नागरिकांना प्रकर्षाने जाणवेल. सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमात येणाऱ्या सर्वांनी दोघांना ह्रदयी शुभेच्छा देऊन सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य आनंदी सुखसमृद्धी आणि आरोग्यदायी जावो अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या