शासकीय नर्सिंग कॉलेज बीड चे रेड रून मॅरॅथॉन स्पर्धेत घवघवीत यश

 शासकीय नर्सिंग कॉलेज बीड चे रेड रून मॅरॅथॉन स्पर्धेत घवघवीत यश

बीड प्रतिनिधी :- शासकीय नर्सिंग कॉलेज बीड ने रेड रून मॅरॅथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.



मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने रेड रून मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे जिल्हा रुग्णालय बीड, जिल्हा क्रीडा अधिकारी चव्हाण उपस्थित होते. स्पर्धेस हिरवा झेंडा दाखवून मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली वाय जंक्शन ते गोवालवडी ट्रॅक ५ किमी अंतर स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले होते. यावेळी शासकीय नर्सिंग कॉलेज जिल्हा रुग्णालय बीड येथील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मुलींमधून प्रथम पारितोषिक प्रतीक्षा कचरू धांडे, द्वितीय पारितोषिक अस्मिता सर्जेराव कांबळे व तृतीय पारितोषिक नेहा बबन धोंगडे या विद्यार्थ्यीनींनी मिळवले तसेच मुलांच्या स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक रोहन मधुकर जोगदंड या विद्यार्थ्याने मिळवले. यावेळी शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा श्रीराम बेदरे, प्राध्यापक रोहन वाघमारे, मुक्ता पवार, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कुलकर्णी, इनामदार, डोलारे, फारुकी आदी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या