पालम शहरात कडकडीत बंद, घोषणाबाजीसह निषेध रॅली

पालम शहरात कडकडीत बंद, घोषणाबाजीसह निषेध रॅली

पालम प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. 
पालमसह तालुक्यात देखील बंद पुकारण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने उघडली नव्हती. तालुक्यातून समाजबांधव सकाळी ऐकत्र जमण्यास सुरूवात झाली. ते पहिल्यांदा शहर पोलीस ठाण्यात
निवेदन देण्यासाठी गेले. तिथे सपोनि मारोती कारवार, दिनेश सूर्यवंशी यांनी निवेदन स्विकारले. तद्नंतर येथून निषेध रॅली काढण्यात आली. ती शनिवार बाजार, पेठपिंपळगांव चौकमार्गे तहसील कार्यालयात गेली. दरम्यान, घोषणाबाजी करून  घटनेचा नोदविण्यात आला. त्यात काही समाजकंटकांनी विकृत मानसिकता या घटनेच्या माध्यमातून दाखवून दिली. त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर माजी सभापती गणेशराव घोरपडे, माजी उपनगराध्यक्ष असद खान पठाण, नगरसेवक ज्ञानराज घोरपडे, कऊबा संचालक माऊली घोरपडे, विजय घोरपडे, मंगेश घोरपडे, सरपंच अतुल धुळगुंडे, मंगेश दयाळ, सुदाम घोरपडे, अक्षय गडगिळे, साहेब वाघमारे, विनोद घोरपडे, होनाजी घोरपडे, चेतन बाळासाहेब लांडे, भागवत हाके, राजू वाघमारे, संदीप घोरपडे, सुभाष आव्हाड, गणेश शेंगोळे, भागवत लेवडे, बसवेश्वर लिंगायत, निलेश घोरपडे, रंजीत सिरस्कर, दत्ता रोकडे, विक्रांत घोरपडे, मुंजाजी घोरपडे, आकाश कऊटकर, दौलत शेंगुळे, तानाजी पैके, अविनाश घोरपडे यांच्यासह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या