मोकाट गाय बैल म्हैस वासरू यांची व्यवस्था करा व अपघातापासून मुक्त करा :- गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचे प्रतिपादन.
७
परभणी प्रतिनिधी :- गंगाखेड रोड परिसरातील परभणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक रोडवर मोकाट फिरणाऱ्या गाय बैल म्हैस अशा जनावरांसाठी प्रशासनाने ठिकठिकाणी कोंडवाडे करून व प्राण्याचे होणारे आपघात टाळण्या साठी व्यवस्था करावी असे संकट चतुर्थीचे औचित्य साधून राष्ट्रजण प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्रच्या वतीने निदर्शनास आणून दिले.
वाहन चालकांनी ही सावकास वहाने चालवून जगा आणि जगुद्या या उक्ती प्रमाणे सावधानता बाळगावी व प्राण्याचे होणारे अपघातापासून रक्षन करावे
प्रशासनाने पाहणी करून मोकळ्या जागेत नसर्गीक पध्दतीने चारापाणी निर्मीती कराव तसेच दुकानदार मालक चालक सर्व कर्मचाऱ्यांनी गाय वासरू बैल म्हैस जर असेल त्यांना हटवून मोकळ्या जागेत सोडण्याचा प्रयत्न करावा.हाच खरा मानवधर्म व ईश्वर धर्म होय गोमाता सेवा होय हीच खरी ईश्वर सेवा होय माय माऊली समजून गाईची सेवा करावी असे आव्हान राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी माध्यमाशी बोलतांना सांगीतले.
गाय वाचवा देश वाचवा गोमाता अपघाता पासून मुक्त करा!!

0 टिप्पण्या