कुत्रे चाटलेल्या आणि मुतलेल्या पाण्यात तयार झालेले खारेमुरे, तापडिया मार्केट समोरच्या गायत्री हॉटेल कॉर्नरवर विकतो बेजबाबदारपणे खैरात जब्बार पठाण !!!*
लातूर प्रतिनिधी :- लातूर शहरातील हनुमान चौक ते सुभाष चौक या रस्त्यावर तापडिया मार्केटच्या समोरील ेॉगायत्री हॉटेल कॉर्नर वर विकले जाणारे खारेमुरे हे चक्क कुत्र्यांनी चाटलेले आणि मुतलेल्या साठवून ठेवलेल्या पाण्यात भिजवलेले असतात.
हनुमान चौकाच्या जवळ गायत्री हॉटेलच्या कॉर्नरवर कुत्रे मुतलेले, कुत्रे तोंड घातलेल्या दुषित पाण्यात खारिमुरी तयार करुन विक्री करुन जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण करत असलेले खैरात जब्बार पठाण हे अत्यंत बेजबाबदारपणे असले खरेमोरे बिनधास्तपणे विकत असतात.
खारेमुरे विकत घेणाऱ्या नागरिकांना याची कल्पनाही नसेल की आपण कुत्रे चाटलेल्या आणि मुतलेल्या पाण्यात भिजवलेले खारेमुरे खात आहोत.
पण हे अगदी खर आहे की लातूरच्या हत्ते नगर भागात गल्ली नंबर दोन मध्ये हे खैरात जब्बार पठाण यांच्या घरासमोर असलेल्या महानगरपालिकेच्या प्रचंड घाण पाणी वाहणाऱ्या गटारीत बसलेले कुत्रे गटारीतून उठतात आणि तिथे वाळू घातलेल्या खारेमुरे वरून जातात.
ते कुत्र्याच्या अंगावरील घाण पाणी त्याच्यावर पडत असतं. आणि एवढेच नव्हे तर ज्या गटारीच्या कडेला खरेमुरे भिजवण्यासाठी पाण्याची टाकी ठेवलेली आहे, त्या टाकीतलं पाणी हे कुत्रे चाटत असतात. त्या टाकीवर कुत्रे मुतत असतात. हा सर्व प्रकार फोटोमध्ये आणि व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आलेला आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या खारेमुरे विक्रेत्यावर प्रशासनाने कार्यवाही करावी अशी तक्रारही प्रशासनाकडे दाखल झालेली आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत हनुमान चौकाजवळ गायत्री हॉटेलच्या कॉर्नरवर खैरात जब्बार पठाण ही व्यक्ती त्याच्या टीव्हीएस एक्सलवर खरिमुरी विक्री करतो. तो त्याच्या घरी खारिमुरी तयार करतो. सदर खारिमुरी तयार करतांना प्रथम तो घाण गटारीच्या दुषीत पाण्याच्या बाजुला व गटारीतील घाण कचरा काढुन बाजुला ठेवलेला असतांना देखील तेथेच रस्त्यावर खारिमुरी तयार करण्यासाठीचे शेंगदाने वाळत घालतो. शेंगदाने वाळत असतांना अनेक वेळा मोकाट कुत्रे तेथेच मुततात, तोंड घालतात व गटारीतून बाहेर येवुन घाण पायाने शेंगदान्यावरुनच जातात.
सदर खारिमुरी धुतेवेळेस ज्या टाकीमधुन पाणी घेतले जाते ती टाकी रात्रभर उघडी असते म्हणुन कुत्रे सतत तेथे पाणी पिण्यास येतात व टाकीवरच मुततात. खारिमुरी तयार होवुन संध्याकाळी जेंव्हा सदर व्यक्ती टीव्हीएस एक्सलवरील ट्रे मध्ये खारिमुरी भरतांना गटारीच्या कडेला व रोडवर पडलेली खारिमुरी उचलुन तसेच ट्रे मध्ये टाकुन विक्रीसाठी घेवुन जातो. अशा परिस्थितीत सदर व्यक्ती दुषित पाण्यात खारिमुरी भिजवणे, गटारीच्या कडेला कचऱ्याजवळच रस्त्यावर खारिमुरी वाळु घालणे, कुत्रे शेंगदाण्यावर मुतणे, कुत्रे तोंड घालणे, गटारीतुन येवुन शेंगदान्यावरुच जाणे, गटारीजवळ खाली पडलेली खारिमुरी.
उचलुन ट्रेमध्ये टाकणे इत्यादी कृतीवरुन सदरची खारीमुरी ही लोकांच्या आरोग्यास किती घातक आहेत हे फोटोवरुन आणि व्हिडिओ वरून दिसुन येते.
अशा या गंभीर प्रकाराबद्दल खारिमुरी विक्री करणारे खैरात जब्बार पठाण यांचे विरुध्द कायदेशिर कार्यवाही करावी व परवाना असेल तर तो रद्द करण्यात यावा व परवाना नसेल तर त्याबाबत ही कार्यवाही करावी, अशी तक्रार प्रशासनाकडे खाजामैनोद्दीन गुलामदस्तगिर मणियार यांनी केली आहे.

0 टिप्पण्या