माजलगाव एस.टी. स्टँड लवकरच होणार अनाधिकृत बॅनर मुक्त

माजलगाव एस.टी. स्टँड लवकरच होणार अनाधिकृत बॅनर मुक्त 

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष इम्रान खाँन यांच्या लढ्यास यश

माजलगांव प्रतिनिधी :- शहरातील नवीन एस.टी. बसस्थानक मध्ये व आवारात मुख्य रस्त्यालगत लागलेले अनाधिकृत  होर्डिंग (बॅनर) आता लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून संघर्ष करणारे अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इमरान खाँन पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मालकीच्या जागेत माजलगांव येथे नवीन बसस्टँड (एस.टी.डेपो) आहे.
 तिथे जाहिरात होर्डिंग (बॅनर) लावण्यात येतात. परंतु याची मुदत सन २०२० पासुन संपलेली आहे. तरीही येथे भव्य प्रमाणात मोठमोठे पक्के अँगल चे लहान-मोठे १२ ते १५ होर्डिंग फ्रेम अनाधिकृतपणे लावुन शहराच्या मध्यवर्ती व सार्वजनिक ठिकाणी रा.प. प्रशासन यांची परवानगी नसतांनाही जाहिरातदारांकडून दररोज
नवनवीन बॅनर लावण्यात येत आहे. 
यामुळे रा.प. महामंडळाला मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान होत आहे. येथे जाहिरातींचे बॅनर लावणाऱ्या व्यक्तीने गेल्या चार वर्षात रा.प. महामंडळाचे आतापर्यंत लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी याकरिता अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इमरान खान पठाण यांनी याविषयी गेल्या दीड महिन्यापासून राज्य परिवहन विभाग कार्यालय, राज्य परिवहन माजलगाव आगार, माजलगाव नगर परिषद, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे शहर शाखा डीएसबी, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर माजलगाव नगर परिषद मुख्याधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र काढून मुदत संपलेले सर्व अनाधिकृत डिजीटल बॅनर चे होर्डिंग येत्या तीन दिवसात काढून टाकावे अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पत्र काढले असून लवकरच अनाधिकृत डिजिटल बॅनरचे होर्डिंग काढले जाणार असल्याची माहिती इमरान खान पठाण यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली असून त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून यासाठी चालविलेल्या संघर्षाला यश आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या