वनस्पतींची ओळख‌ करण्यासाठीचे डिव्हाईस डिजाइन विकसित, पेटंटला भारत सरकारने केले प्रकाशित

वनस्पतींची ओळख‌ करण्यासाठीचे डिव्हाईस डिजाइन विकसित, पेटंटला भारत  सरकारने केले प्रकाशित 
वनस्पती ओळखण्यासाठी कमी खर्चात तयार होणाऱ्या उपकरणांची डिव्हाईस डिझाईन विकसित, डॉ राजेंद्र काकडे, डॉ भरत धोत्रे, डॉ राजेश गायकवाड, डॉ धोंडिराम गडगिळे आणि डॉ स्वप्नील महामुने यांचे  पेटंट संशोधन  भारत सरकार पेटंट कार्यालयाने केले प्रकाशित 


पालम प्रतिनिधी विनोद कांबळे :- वनस्पती ओळखण्यासाठी कमी खर्चात तयार होणाऱ्या उपकरणांची डिव्हाईस डिझाईन तयार करण्याचे संशोधन डॉ राजेंद्र काकडे, डॉ भरत धोत्रे, डॉ राजेश गायकवाड, डॉ धोंडिराम गडगिळे आणि डॉ स्वप्नील महामुने ह्या साहाय्यक प्राध्यापकांनी केले आहे.
  या नाविन्यपूर्ण अशा संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार हे संशोधन पेटंट, भारत सरकार पेटंट कार्यालयाने नुकतेच प्रकाशित केले. सदरील संशोधनामुळे वनस्पतींची ओळख‌ करण्यासाठीचे डिव्हाईस कमी खर्चात तयार होणे शक्य आहे.
डॉ काकडे, डॉ धोत्रे आणि डॉ गायकवाड हे स्वामी विवेकानंद वरीष्ठ विद्यालयात कार्यरत आहेत तर डॉ गडगिळे हे माधवराव पाटील महाविद्यालय, पालम जिल्हा परभणी येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत आणि डॉ महामुने अमरावती येथील शासकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.  या  संशोधनाचा सदरील डिव्हाईस हे मिनी क्वूआर कोड प्रमाणे काम करते. 
हे उपकरण खूप कमी बजेटमध्ये तयार केले जाऊ शकते. हे उपकरण वनस्पती शास्त्रातील संशोधक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे.     या सर्व संशोधकांचे अभिनंदन भाई लक्ष्मणराव गोळेगांवकर, भाई तुषार गोळेगांवकर, आशाताई अकात,  श्री. कुनालदादा आकात, श्री कपिलभैयया अकात, प्राचार्य डॉ सातपुते, प्राचार्य डॉ थिटे,  आणि सर्व सहकारी प्राध्यापकांनी केले आहे.तसेच या यशाबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठितांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या