वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याची नियोजन बैठक संपन्न.
संविधान सन्मान महासभेत" सामिल व्हा.. गणेशभाऊ चौकसे.
बुलढाणा प्रतिनिधी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात शिवाजी पार्क, मुंबई येथे दि. 25 नोव्हेंबर 2023 रोजी "संविधान सन्मान महारॅली व महासभा" आयोजित करण्यात आली आहे
या संविधान सन्मान महासभेस समस्त संविधान प्रेमी व संविधान बचाव मोहिमेत सक्रिय कार्य करणाऱ्यांनी सहभागी होण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या अध्यक्षतेखाली तथा जिल्हा महासचिव अतिशभाईं खराटे यांचे मार्गदर्शनाखाली मुख्य आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन (उत्तर) बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने टीएमसी हॉल खामगाव येथे नियोजनात्मक बैठक पार पडली
यावेळी राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान वाचवण्यासाठी व समता, न्याय, स्वातंत्र्य, हक्क, मताधिकार तसेच वंचित घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या भारतिय संविधानाच्या सन्मानासाठी मुंबईत "संविधान सन्मान महासभेत" जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे सामिल व्हावे असे आवाहन बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी केले
या नियोजन बैठकीस महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग, युवक जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ वाकोडे या प्रमुख मार्गदर्शकासह ,जि. संघटक भाऊराव उमाळे, जि.उपाध्यक्षा प्रीतीताई शेगोकार, पार्वताताई इंगळे, सुमनताई थाटे, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, बा.स.सदस्य राजेश हेलोडे, जि.सदस्य मनोहर सनगाळे,जि.उपाध्यक्ष भगवान इंगळे, चंद्रभान कळंबे, जि.उपाध्यक्ष विजयभाऊ तायडे,जि.संघटक अरुण पारवे, जी.उपाध्यक्ष एड.सदानंद ब्राह्मणे, जी.संघटक वसंतराव तायडे, जी.उपाध्यक्ष मनोहर जाधव, श्रीकृष्ण पहुरकर, जि.प्रवक्ता एड. रवींद्र भोजने, प्रमोद इंगळे, रवींद्र गुरव, सम्यक आंदोलन जि. सचिव राज वानखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष सुशील मोरे, खामगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, महासचिव नरेंद्र तायडे मलकापूर युवा तालुकाध्यक्ष भारत झाल्टे, महासचिव अजय इंगळे, युवा तालुकाध्यक्ष शेगाव अर्जुन शेगोकार, शहराध्यक्ष संदेश शेगोकार, तुकाराम रोकडे, सलीमभाई मंडपवाले, गिरीश उमाळे, दीपक विरघट, गणेश सावळे, जी. सदस्य ताराबाई तायडे, शेगाव महिला तालुकाध्यक्ष संगीता गवारगुरु, शहराध्यक्ष संगीताताई ससाने, मलकापूर महिला नेत्या संगीता सावळे आदी जिल्हा तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते

0 टिप्पण्या