गोपाष्टमी दिन महोत्सवा निमित्त गोसेवकांचा व गोपालकांचा सत्कार.
परभणी प्रतिनिधी :- गोपाष्टमी दिन महोत्सव च्या निमित्ताने राष्ट्रजण प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या वतीने परभणी शहरातील जिल्ह्यातील गोशाळा चे संचालक व गोरक्षक सत्कार व स्वागत करण्यात आले सत्कारमूर्ती - कृष्णप्रिय गोशाळा झाडगाव चे संस्थापक सचिव गोसेवक मारुतराव खंटिग महाराज झाडगावकर,
माता इंद्रायणी गोशाळे ब्राह्मणगावचे अध्यक्ष दत्ता पहारे, लक्ष्मी नारायण मंदिर गोशाळा चे संचालक व्यंकटेश महाराज शर्मा यांनी गोमातेची सेवा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार दिनांक वीस नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मी नारायण गोशाळा परभणी येथे स्वागत करण्यात आले या गो सत्काराचे संयोजक राष्ट्रजण प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र चे अध्यक्ष. गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने गोपाष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा गाई वळण्याचा चारण्याचा दिवस म्हणजेच गोपाष्टमी उत्सव साजरा केला जातो गो सेवकांचे गोरक्षकांचे गो भक्तांचे स्वागत व सत्कार करून प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले अशी माहिती गोपालक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

0 टिप्पण्या