मातंग शक्ती संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या मागणीस जाहीर पाठिंबा

मातंग शक्ती संघटनेच्या वतीने सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या मागणीस जाहीर पाठिंबा

परभणी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे.
 त्यामध्ये गावोगावी साखळी उपोषणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर आमरण उपोषण चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाज, उदगीरच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून साखळी उपोषण चालू आहे. या आरक्षणासंदर्भातील सर्व उपोषणास व आरक्षणास मातंग शक्ती या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.सुधाकरजी भालेराव साहेब यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली मातंग शक्तीच्या वतीने दि.31.10.2023 रोजी मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.

यासंदर्भातील निवेदन मातंग शक्तीचे प्रदेश सरचिटणीस अॅड.श्याम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठिंब्याचे पत्र उपोषणकर्त्या मराठा बांधवांना देण्यात आले. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष संग्राम अंधारे, उदगीर तालुकाध्यक्ष मिलिंद कसबे, उदगीर शहराध्यक्ष कनवर सकट, तालुका कार्याध्यक्ष उध्दव गायकवाड, शहर कार्याध्यक्ष राजू सूर्यवंशी, बाळू कांबळे, पांडुरंग कांबळे, करण अंधारे, रमाताई वाघमारे, वर्षाराणी धावारे, कृपा सूर्यवंशी, भीमराव गायकवाड, गोविंद जाधव, दीपा कोंगे, कांताबाई सुर्यवंशी लता जाधव, राम जाधव, अजय कसबे, अमर कसबे, भरत तुरेवाले, आनंद कांबळे, महेश धावारे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या