महातपुरी येथील शिक्षण समिती व ग्रामपंचायच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा बनली आदर्श


महातपुरी येथील शिक्षण समिती व ग्रामपंचायच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळा बनली आदर्श

गंगाखेड प्रतिनिधी :- जिल्हा परिषद शाळा कशी असावी हे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून गावकऱ्यांच्या मदतीने सहकार्याने आणि शिक्षक शिक्षिका यांच्या माध्यमातून संपूर्ण परभणी जिल्ह्यातील एक नंबर जिल्हा परिषद शाळा म्हणून
 नावारूपास आली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा महातपुरी गंगाखेड पासून हक्केच्या अंतरावर गोदावरीच्या कुशीत अंबिका देवीच्या सानिध्यात अठरापगड जाती धर्माचे बारा बलुतेदार आणि अगणित विचारांच्या अधीन असलेले गावं म्हणजे
 महातपुरी शाळेला एकदम नियोजनबद्ध पद्धतीने घडवण्याचे काम गेल्यावर्षी पासून सुरू झाले ते म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शेख अमजद अफजल यांच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची लेकरं घडावी म्हणून खूप प्रयत्न चालू आहेत 
गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडावे गोरगरिबांची सर्वसाधारण माणसांची शेतकऱ्यांची कष्टकरी कामगार मोलमजुरी लोकांची मुल मुली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतच शिक्षण घेतील इतकी इथ सोय झाली आहे शाळेत खूप बारकाईने निरीक्षण करून नियोजन केले आहे शाळा ही गावकरी मंडळी आणि ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून सर्व योजना आखली जाऊन घडवली आहे जनतेचा आवाज सध्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शेख अमजद अफजल उप अध्यक्ष श्री सुंदर दादा मुलगिर ह्यांचे विचार व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ह्यांच्या माध्यमातून खूप जोमाने काम करत आहे शाळेला खरच अध्यक्ष असावा तर कर्तृत्ववान कर्तव्य दक्ष सामाजिक कार्यकर्ता शेख अमजद भाई यांच्या सारखा अध्यक्ष असावा शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात शाळेत लोकसहभागातून शाळेत खूप मोठ्या मोठ्या भेट वास्तू दिल्या जातात विद्यार्थ्याना शालेय साहित्य दिले जाते शाळेत पोषण आहार खूप दर्जेदार मिळतो शाळेत सगळ्या शिक्षक शिक्षिका यांची सुधा खूप मेहनत आहे ते विद्यार्थ्याना खूप जीव लाऊन शिकवतात एकंदरीत ही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सर्वगुण संपन्न झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या