भारतीय जनता पार्टीचा जनसेवेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कटिबद्ध.भाजपा जिल्हा अध्यक्ष, संतोष मुरकुटे,
परभणी जिल्हा प्ररतिनिधी :- देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा जनसेवेचा विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्य करत आहेत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे, त्या अनुषंगाने, कार्यकर्ते जिल्हाभरामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत आहेत, भाजप हा पक्ष सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना न्याय देणारा असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी देशभरामध्ये अग्रेसर आहे,
भारतीय जनता पार्टी पूर्णा तालुका वतीने आयोजित रक्तदान शिबिरात जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे बोलत होते, वार बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेवा पंधरवाडा निमित्ताने रक्तदान शिबिराचे ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात, आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावरती भाजपा परभणी ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री संतोष मुरकुटे, सरचिटणीस भागवत बाजगीर, विलास बाबर,जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदेश्वर बल्लोरे ,तालुका अध्यक्ष नरहरी ढोणे ,विधानसभा निवडणूक प्रमुख बालाजी रुद्रवार, आनंद बनसोडे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, राजू देवकते, पालम तालुका अध्यक्ष रुपेश सिंगारे, उद्धव मोरे ,भाजप ताडकळ शहराध्यक्ष मनू पाटील आंबोरे, सरपंच सैनाजी माठे,
यावेळी भाजप कार्यकर्ते गोपाळ आंबोरे, संजय मोहिते, नंदेश घोंशिकर, शिवाजी चौधरी ,राम गवते केशव आंबोरे, बंडू बोगळे, अशोक होनमाने, बबन अंबारे भीमाशंकर शिराळे ,शिवकुमार शिराळे ,लक्ष्मण सोनवणे ,गोपाळ भोसले ,प्रभाकर शिंदे, प्रताप काळे ,रमेश आंबोरे, बालाजी कदम, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे म्हणाले की रक्तदान हे अमूल्य दान असून मानवी जीवनामध्ये जीवनदान देणारे दान आहे. असे रक्तदान शिबिर कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये राबवून देशाच्या आरोग्य सेवेत योगदान द्यावे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप जेष्ठ कार्यकर्ते बालासाहेब कापसे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर गोपाळ आंबोरे,संजय मोहिते मनूकाका आंबोरे, केशव आंबोरे.भाजप कार्यकर्ते आदी यांनी परिश्रम घेतले...

0 टिप्पण्या